कोरोना व्हायरस संशयितांना बंदुकीचा धाक दाखवून चीनमध्ये पकडलं जातंय असा दावा केला जातोय. व्हिडीओत पोलिस काही लोकांना बंदुकीचा धाक दाखवून पकडत असल्याचं दिसतंय.पण, चीनमध्ये अशा प्रकारे पोलिस कोरोना संशयितांना पकडतायत का ? एवढी क्रूर वागणूक कोरोना संशयितांना दिली जातेय का ? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा सविस्तर.
हा मेसेज आणि पुरावा म्हणून व्हिडीओ व्हायरल केला जातोय.कोरोना संशयितांनाच चीनमध्ये पकडलं जातंय असे मेसेज व्हायरल केले जातायत.चीनमध्ये कोरोनाचे पेशंट अधिक असल्याने लोक यावर विश्वास ठेवतायत.पण, खरंच हा व्हिडीओ कोरोना व्हायरस संशयितांना पकडतानाचा आहे का ? अनेकजण कोरोनाच्या नावाने अफवा पसरवतायत.लोकांच्या मनात भीती निर्माण करतायत.त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली.कोरोना व्हायरसबद्दल अनेकजण खिल्ली उडवताय.सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करतायत.पण, आम्ही या व्हिडीओची सत्यता जाणून घेतली.पडताळणी करत असताना हा व्हिडीओ जुना असल्याचं समोर आलं.त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.
हाँगकाँगमध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ कोरोनाच्या नावाने व्हायरल केला जातोय.पण, या व्हिडीओचा कोरोनाशी काहीही संबंध नाही.असे कोणतेही व्हिडीओ व्हायरल करू नका.आमच्या पडताळणीत कोरोना संशयितांना बंदुकीचा धाक दाखवून पकडत असल्याचा दावा असत्य ठरला.
web title : viral satya china clamping down suspect of coronavirus
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.