Viral | कोरोनाच्या धसक्याने केस कापण्यासाठी चार फूट लांब कात्रीचा वापर

संदीप चव्हाण
शुक्रवार, 6 मार्च 2020

चीनमध्ये कोरोना व्हायरसची दहशत इतकी वाढलीय की लोक एकमेकांनाही भेटत नाहीयेत.आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात चीनमध्ये केस कसे जातात हे दाखवण्यात आलंय.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने दहशत माजवलीय.अजून कोरोनावर औषध उपलब्ध न झाल्याने कोरोना आटोक्यात येत नाहीये.त्यामुळं अनेकांनी धसका घेतलाय.लोक स्वत:ची काळजी घेऊ लागलेयत.त्यांचेच नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतायत.एक व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात केस कापण्यासाठी चक्क चार फूट लांब कात्रीचा वापर केला जातोय.एवढ्या लांब उभं राहून केस कापले जातायत.काठीला केस कापण्याची मशिन बांधून केस कापले जातायत.एखाद्या व्यक्तीला भेटायचं म्हटलं तरी लांबूनच नमस्कार केला जातोय.एवढा भयानक आजार जगभर पसरल्याने सगळ्यांनीच धसका घेतलाय.

हे ही वाचा : साबणाने अंघोळ करणं आरोग्यास घातक ?

केस कापणाऱ्याने आपल्या तोंडाला मास्क लावलंय.दोन मोठ्या काठ्या घेतल्यायत.एका काठीला केस कापण्याची मशिन बांधलीय तर दुसऱ्या काठीला कंगवा बांधलाय आणि लांब उभं राहून ही व्यक्ती केस कापतेय.इतकंच नव्हे तर केस कलर करण्यासाठीही अशाच प्रकारे लांब उभं राहून केसांना कलर लावला जातोय.कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अशी काळजी घेतली जातेय.कुणीही कुणाला शेकहॅन्ड करत नाही.लांबूनच बोललं जातं.तोंडाला मास्क लावला जातोय.त्यामुळे केस कापणाऱ्यांनीही कोरोनाच्या भीतीने ही शक्कल लढवलीय.

व्हिडीओ पाहा : कोरोनामुळे केस कापण्यासाठी चक्क 4 फूट लांब कात्रीचा वापर

अशाच प्रकारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत.पण, याचे जोक्स न करता आपणही काळजी घेणं सध्याच्या घडीला महत्त्वाचं आहे.चीनमध्ये कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रत्येकजण आपली काळजी घेताय.आता भारतातही अनेक रुग्ण आढळलेयत.त्यामुळं आपणही काळजी घ्यायला हवी.

web title : viral satya chinese hairdresser in an epidemic


संबंधित बातम्या

Saam TV Live