Viral | कोरोनापासून बचावासाठी 'बॅटमॅन' सूट !

Viral satya corona bachav batman jacket 
Viral satya corona bachav batman jacket 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातायत.पण, कोरोनावर औषध काही सापडत नाहीय.कोरोनापासून बचाव करण्यासाठी सूट बनवले जातायत.मास्क बनवले जातायत.त्यातच आता एका नवीन सूटची निर्मिती करण्यात आलीय.आतापर्यंत चित्रपटात पाहिलेला बॅटमॅन सूट मार्केटमध्ये उपलब्ध होणाराय.हा सूट घातला की माणूस वटवाघळासारखा दिसतो.त्यामुळेच या सूटला बी अ बॅटमॅन असं नाव दिलंय.एक फायबर फ्रेम डिझाईनचा सूट तयार करण्यात आलाय.हा सूट वापरून कोरोना व्हायरसपासून बचाव करता येतो.असा दावा सूट बनवणारे द्याँग सन यांनी केलाय.


जगभरात एक लाखापेक्षा जास्त लोक कोरोनाचे संशयित पेशंट आढळलेयत.तर हजारो पेशंटचा मृत्यू झाला.यामुळं कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता जागतिक पातळीवर अलर्ट जारी करण्यात आलाय.पण, हा या सूटमुळे काय उपयोग होऊ शकतो वाचा सविस्तर माहिती.

  • बॅटमॅन सूटचा उपयोग काय ?
  • हा सूट कारच्या विंडशिल्डसारखा आहे
  • हिवाळ्यात काचेवर बर्फ जमा होऊ शकणार नाही
  • थर्मोप्लास्टिकचा सूट असून सूट घालणाऱ्यास एका फ्रेममध्ये ठेवतो
  • हा सूट घातल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो
  • पाठीवर बॅग लावतो तसा हा सूट घालता येतो

हा सूट चारही बाजूंनी बंद असल्याने अल्ट्रा-व्हायोलेट किरणे आत पोहोचून आतील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त राहते.असं असलं तरी या किरणांच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यास त्वचेला खाज सुटू शकते.पण, हा सूट मार्केटमध्ये आल्यास कोरोनापासून बचाव करणं शक्य होणाराय.त्यामुळं हा सूट मार्केटमध्ये कधी येईल याच्याच प्रतिक्षेत अनेकजण आहेत.कोरोनानं जगभर थैमान घातल्याने त्यावर औषध शोधण्याचं काम सुरू आहे.तरीदेखील तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर काळजी घ्या.आणि तुम्ही सतर्क राहा.

web title : Viral satya corona bachav batman jacket 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com