Viral | होळीच्या रंगात कोरोना व्हायरस ?

संदीप चव्हाण
बुधवार, 4 मार्च 2020

होळीचा सण जवळ आलाय.होळीत रंगपंचमीला आपण रंगांची उधळण करतो.हे रंग चीनमधून येत असल्याने कोरोना व्हायरसचा धोका असल्याचा दावा केला जातोय.पण, खरंच कोरोना व्हायरस रंगांमुळे होऊ शकतो का ? याची आम्ही पडताळणी केली.

होळीत रंगांची उधळण करताय तर सावधगिरी बाळगा असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.होळीत रंगपंचमीला उधळले जाणारे रंग चीममधूनच येत असल्याचा दावा केला जातोय.या रंगांमुळे कोरोना व्हायरसचा धोका असून, रंगापासून लांबच रहा अशा आशयाचा मेसेज व्हायरल करण्यात आलाय.भारत सरकारच्या नावाने मेसेज असल्याने लोकांचा यावर विश्वास बसू लागलाय.पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा.

  • व्हायरल मेसेज

कोरोना व्हायरसच्या भीतीने रंगपंचमी खेळू नका कारण रंग हा चीन मधूनच येतो.त्यामुळे आपल्यालाही कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. एका दिवसाच्या मजेसाठी आयुष्य धोक्यात घालू नका.म्हणून यंदा रंगांपासून लांबच राहा
 

हे ही वाचा- बाईकलाही कान असतात ?

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.अनेकजण होळीत रंग उधळत असल्याने याबद्दलची माहिती सगळ्यांना कळायला हवी.त्यामुळं आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले.त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच रंगांमुळे कोरोना व्हायरसचा धोका निर्माण होऊ शकतो का हे जाणून घेतलं.चीनमधून रंग मोठ्या प्रमाणात भारतात येतात हे खरं आहे.पण, कोणता रंग आहे हेदेखील जाणून घ्यायला हवं.त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

  • व्हायरल सत्य

भारत सरकारच्या नावानं व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे
 
सरकारकडून कोणत्याही सूचना अथवा सर्क्युलर अद्याप केंद्राकडून आलेल्या नाहीत

चीनमधून रंग आलेले असतील, तरी ते कधी आलेत? कोणत्या स्वरूपात आहे हे आधी तपासावं लागेल

कोरड्या रंगामध्ये कोरोना व्हायरस टिकू शकत नाही

कोरोना व्हायरस जिवंत राहण्यासाठी विशिष्ट तापमान गरजेचं असतं

कोरड्या रंगांमुळे व्हायरस पसरू शकतो, याची शक्यता नाही
 

व्हिडीओ पाहा : होळीच्या रंगात कोरोना व्हायरस ?

रंग जर ऑईल, केमिकल, पाण्याच्या स्वरूपात पॅक डब्यांमध्ये आलेले असतील तर त्याची आधी तपासणी करायला हवी.कारण त्याचे तापमान किती आहे ? त्यामध्ये व्हायरस जिवंत राहू शकतो का? याची तपासणी करणं गरजेची आहे.आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला असून, तुम्ही तरीदेखील काळजी घ्या.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live