Viral | कोरोनाच्या भीतीने टॅक्सी चालक प्रवाशांची करतायत तपासणी ?

संदीप चव्हाण
बुधवार, 18 मार्च 2020

टॅक्सीत बसायचं असेल तर आधी टॅक्सीचालक प्रवाशाची तपासणी करतो.सर्दी, ताप नाहीये ना हे पाहूनच टॅक्सी चालक प्रवाशाला टॅक्सीत बसवतो.पण, हे नक्की चाललंय तरी कुठे ? याची आम्ही पडताळणी केली.

कोरोनानं जगभरात थैमान घातलंय.लोकांनी आता परदेशात जाणं बंद केलंय.एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी चेकिंग केली जाते.त्यामुळं आता लंडनमध्ये टॅक्सी चालकांनीही खबरदारी घेतलीय.

हे ही वाचा : कोरोनाच्या भीतीने लोक घरातून करतायत मनोरंजन ! कसे, पाहा व्हिडीओ

टॅक्सीमध्ये बसण्याआधी प्रवाशांची तपासणी केली जाते.टॅक्सी ड्रायव्हरने प्रवाशाला टॅक्सीत बसवण्यासाठी स्वत: ड्रायव्हर खाली उतरला आणि आधी या प्रवाशाला ताप आहे का हे तपासून पाहिलं.तास नाहीये हे लक्षात येताच या ड्रायव्हरनं प्रवाशाच्या हाताला सॅनिटायझर लावायला दिलं.सॅनिटायझर लावून या प्रवाशाला टॅक्सीमध्ये बसवलं.त्यानंतर जिथे प्रवाशानं टॅक्सीला हात लावला तिथे स्वच्छता करून घेतली.त्यानंतरच हा टॅक्सी चालक या प्रवाशाला घेऊन गेला.एवढी खबरदारी लंडनमध्ये घेतली जातेय.

व्हिडीओ पाहा : टॅक्सी चालक प्रवाशांची करतायत तपासणी? 

व्हिडीओ आता व्हायरल होतोय.लंडनमध्ये अशा प्रकारे काळजी घेतली जातेय.प्रवाशी कुठून कुठून येत असतात, त्यामुळं टॅक्सी चालक प्रवाशांना तपासूनच टॅक्सीत बसण्याची परवानगी देतात.टॅक्सी ड्रायव्हरही आपली काळजी म्हणून मास्क वापरतोय.अशा प्रकारे कोरोनापासून बचावासाठी लंडनमध्ये काळजी घेतली जातेय.त्यामुळे आपणही अशाच प्रकारे काळजी घ्यायला हवी.

web title : viral satya corona virus london taxi driver treating passengers


संबंधित बातम्या

Saam TV Live