Viral | अंगावर स्प्रे मारून कोरोना व्हायरस पेशंटला पकडतात ?

संदीप चव्हाण
शुक्रवार, 6 मार्च 2020

कोरोना व्हायरसचा पेशंट कसा ओळखतात हे तुम्ही पाहिलंय का? जर पेशंट आढळला तर त्याला कसं पकडतात याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.पण, खरंच चीनमध्ये कोरोनाचा पेशंट पकडण्यासाठी टीम तयार केलीय का? याची आम्ही पडताळणी केली.

चीनमध्ये कोरोना पेशंटला कसं पकडलं जातं त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.व्हिडीओत एक व्यक्ती कारनं चालली होती.त्यावेळी पोलिसांनी कार थांबवून या व्यक्तीच्या डोक्याला थर्मामीटर लावून ताप तपासला.त्यावेळी या व्यक्तीला ताप असल्याने त्याला पकडून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.पण, या व्यक्तीला कसं पकडलं जातं तेही दाखवण्यात आलं.कारमधून उतरल्यानंतर या व्यक्तीच्या डोक्यात कपडा टाकला आणि या व्यक्तीला पकडून नेलं.

हे ही वाचा :बंद झालेली एक हजाराची नोट पुन्हा चलनात आली ?

पेशंटला ऍडमिट करण्यासाठी या सगळ्यांनी स्वत:चं संरक्षण केलंय.तोंडाला मास्क लावलाय.तर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सूट घातलाय.त्यानंतर जंतूनाशक स्प्रे मारण्यात आला.अशा प्रकारे कोरोना पेशंटला पकडून ऍडमिट केलं जातं.पण, चीनमध्ये खरंच अशा प्रकारे कोरोना पेशंटला पकडून ऍडमिट केलं जातंय का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं वाचा.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • कोरोना दुसऱ्यांना होऊ नये याची खबरदारी म्हणून डेमो दाखवण्यात आलाय
  • कोरोना व्हायरस पेशंटला पकडून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं
  • कोरोना पेशंट असेल तर आपण काय काळजी घ्यावी हे दाखवण्यासाठी व्हिडीओ बनवलाय

व्हिडीओ पाहा : अंगावर स्प्रे मारून कोरोना व्हायरस पेशंटला पकडतात ?

कुणालाही कोरोनाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते.याचंच प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय.हा व्हिडीओ चीनचा असून, कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी ही काळजी घेतल्याचं समोर आलंय.

web title : viral satya corona virus patient excercise 


संबंधित बातम्या

Saam TV Live