कोरोना व्हायरस रुग्णांवर उपचार करणाऱ्या सिस्टर्सचा डान्स?

संदीप चव्हाण
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलाय.हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला रुग्ण घरी पुन्हा येईल की नाही याची शाश्वती नाही.त्यातच रुग्णांवर उपचार करणाऱ्या सिस्टर्सनी डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.एवढी परिस्थिती गंभीर असताना सिस्टर्सनी नक्की डान्स कोणत्या आनंदात केला ? याची आम्ही पडताळणी केली.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवलाय.हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला रुग्ण घरी पुन्हा येईल की नाही याची शाश्वती नाही.त्यातच रुग्णांवर उपचार करणाऱ्या सिस्टर्सनी डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.एवढी परिस्थिती गंभीर असताना सिस्टर्सनी नक्की डान्स कोणत्या आनंदात केला ? याची आम्ही पडताळणी केली.

सोशल मीडियावर दोन सिस्टरच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आम्ही व्हिडीओची पडताळणी केली.चक्क दोन सिस्टर्स डान्स करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं.चीनमध्ये एकतर कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय.अनेक जणांनी कोरोना व्हायरसमुळे जीव गमावलाय.असं असताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सिस्टर्सने डान्स कसा केला हाच प्रश्न विचारला जातोय? त्यामुळं सिस्टर्सनी कोणत्या आनंदात डान्स केला याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा-https://www.saamtv.com/viral-satya-dog-plays-cricket-wicketkeeper-kids-9686?tid=3

दोन सिस्टर्स रुग्णांवर उपचार करून बाहेर आल्यानंतर त्यांनी डान्स केल्याचा दावा केला जातोय.पण, खरंच कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर डान्स केलाय का.? या सिस्टर्सना एवढा आनंद कसला झालाय.? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.याबद्दल अधिक माहिती चीनमधल्या हॉस्पिटलमधून मिळू शकते.त्यामुळे हॉस्पिटलने याबद्दल काही माहिती दिलीय का? याची पडताळणी सुरू केली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

काय आहे व्हायरल सत्य पाहा.

पीपल्स डेली चायना या ट्विटर अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केलाय

हॉस्पिटलमधील दोन रुग्ण बरे झाल्याने सिस्टर्सनी डान्स केला

कोरोना व्हायरसचे रुग्ण बरे होत असल्याने सिस्टर्सनी डान्स करत आनंद व्यक्त केला

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्यांची संख्या 2715 वर गेलीय.तर 78 हजार रुग्ण उपचार घेतायत.आता रुग्ण बरे होत असल्याने अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टर आनंद व्यक्त करतायत.अशातच या दोन सिस्टर्सनी 6 रुग्ण बरे होत असल्याच्या आनंदात डान्स केला.त्यामुळं आमच्या पडताळणीत हॉस्पिटलमध्ये सिस्टर्सनी डान्स केल्याचा दावा सत्य ठरला.आतापर्यंत कोरोना व्हायरसचे रुग्ण बरे होत नव्हते.आता उपचाराला ते प्रतिसाद देऊ लागल्याने डॉक्टरांनाही आनंद होऊ लागला.याच आनंदात सिस्टर्सनी डान्स केला.

पाहा व्हिडीओ- https://www.youtube.com/watch?v=W3DueL0H1Hw

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live