Viral | चीनमध्ये अंत्यसंस्कारामुळे सल्फर डायऑक्साईडमध्ये वाढ?

संदीप चव्हाण
मंगळवार, 17 मार्च 2020

चीनमध्ये कोरोना पेशंटचे सामूहिक अंत्यसंस्कार केल्यामुळे सल्फर डायऑक्साईडची वाढ झाल्याचा दावा केलाय.पुरावा म्हणून फोटोही व्हायरल करण्यात आलाय.पण, चीनमध्ये खरंच सामूहिक अंत्यसंस्कार केल्याने सल्फर डायऑक्साईडची वाढ झालीय का ? याची आम्ही पडताळणी केली.

वुहान आणि चॉनचिंगमध्ये सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याचा एक फोटो व्हायरल होतोय.सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आल्याने हे घडल्याचा दावा केला जातोय.चीनच्या वुहान आणि चॉनचिंगमध्ये सल्फर डायऑक्साईड गॅस खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सांगितलं जातंय.या दोन्ही जागी कोरोना व्हायरस ग्रस्त भाग म्हणून ओळखले जातात.पण,खरंच चीनमध्ये अंत्यसंस्कार केल्याने सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय का ? याची आम्ही पडताळणी सुरू केली.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा.

व्हायरल मेसेज
चीनमध्ये वुहान आणि चॉनचिंगमध्ये कोरोनाग्रस्त अधिक असल्याने त्यांचे सामूहिक अंत्यसंस्कार केले.त्यामुळं तिथे सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढलंय

 

हे ही वाचा : सॅनिटायझरचा अतिवापर घातक?

हा दावा केल्यानं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले.पण, त्यांचे सामूहिक अंत्यसंस्कार केले का? सामूहिक अंत्यसंस्कार केल्याने सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं का? याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

चीनची मिनिस्ट्री ऑफ इकॉलजी अँड इनव्हायरमेंटची अधिकृत वेबसाइट तपासली.या वेबसाईटवर 13 फेब्रुवारी 2020 रोजीची एक प्रेस रिलीज मिळाली.त्यावेळी या फोटोबद्दलची सगळी माहिती समोर आली.नक्की हा फोटो आहे तरी कधीचा ? खरंच चीनमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार केल्याने सल्फर डॉयऑक्साईडचे प्रमाण वाढलंय का ? वाचा यामागचं व्हायरल सत्य.

  • व्हायरल सत्य
  • अंत्यसंस्कार केल्याने सल्फर डायऑक्साईडमध्ये 
  • वाढ झाल्याचा दावा खोटा
  • सल्फर डायऑक्साईडचा फोटो सॅटेलाईटमधून दिसण्यासाठी 3 कोटी लोकांचे अंत्यसंस्कार करावे लागतील
  • फोटो सॅटेलाईटमधला नसून, हवामान अहवालाची नोंद दाखवत असल्याचा फोटो आहे

व्हिडीओ पाहा : सामूहिक अंत्यसंस्कारामुळे सल्फर डायऑक्साईडमध्ये वाढ होते?

आमच्या पडताळणीत चीनमध्ये सामूहिक अंत्यसंस्कार केल्याने सल्फर डॉयऑक्साईडचे प्रमाण वाढल्याचा दावा असत्य ठरला.त्यामुळे अशा व्हायरल फोटोंवर विश्वास ठेवू नका.


संबंधित बातम्या

Saam TV Live