Viral | टिकटॉकवर कोरोना व्हायरस चॅलेंज !

संदीप चव्हाण
शुक्रवार, 20 मार्च 2020

टिकटॉकवर कोरोना व्हायरस चॅलेंज व्हायरल होतंय.त्या व्हिडीओतून कोरोनापासून कसा बचाव करायचा याबद्दल सल्ले दिले जातायत.

कोरोना व्हायरस चॅलेंज सध्या चांगलंच व्हायरल होतंय...एकीकडे कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरलीय.तर, दुसरीकडे नेटकरी कोरोना व्हायरस चॅलेंज करण्यात व्यस्त झालयेत.सोशल मीडियावर सध्या करोना व्हायरस चॅलेंज हे चर्चेत आलंय.या चॅलेंजचे व्हिडिओ टिक-टॉकवर देखील व्हायरल होतायत.काही नेटकरी कोरोना व्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी काय करावं ? यासाठी व्हिडिओ तयार करतायत.तर, काही लोक करोनाचे गांभीर्य न बाळगता विचित्र प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.तुम्ही विचित्र व्हिडीओकडे दुर्लक्ष करा.कारण, काही लोक लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडीओ व्हायरल करतायत.

हे ही वाचा : A रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका ?

सध्या व्हिडीओ कोरोना व्हायरस चॅलेंज म्हणून चर्चेत आलेयत.आपणच आपली काळजी कशी घ्यावी हे व्हिडीओतून दाखवण्यात आलंय. शिंकल्यानंतर आपल्या हातावर किती जंतू येतात त्याबद्दल दाखवण्यात आलंय.त्यामुळं तुम्ही योग्य त्या गोष्टींचा विचार करा आणि आपली काळजी घ्या.

व्हिडीओ पाहा :  टिकटॉकवर कोरोना व्हायरस चॅलेंज ! 

या व्हिडिओमधून कुठेही स्पर्श करताना काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलंय.अशा प्रकारे आपण काळजी घेतली तर कसलाही धोका निर्माण होणार नाही.त्यामुळं तुम्हीही सतर्क राहा आणि कोरोनापासून आपला बचाव करा.

web title : viral satya corona virus tiktok challenge viral


संबंधित बातम्या

Saam TV Live