Viral | कोरोनाच्या भीतीने देशभरात जागोजागी लावले वॉश बेसिन

संदीप चव्हाण
शनिवार, 14 मार्च 2020

कोरोना व्हायरसच्या भीतीने एका देशात सगळीकडेच वॉश बेसिन लावलेयत.जागोजागी, रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी सगळीकडेच वॉश बेसिन पाहायला मिळतात.पण, हा देश आहे तरी कोणता ? वाचा सविस्तर.

कोरोना व्हायरसच्या भीतीने देशभरात जागोजागी वॉश बेसिन लावलेयत.प्रत्येकजण वॉश बेसिनचा वापर करतोय.कुणालाही भेटायचं असेल तर आधी या वॉश बेसिनमध्ये स्वच्छ हात धुतले जातात.त्यानंतरच कुणाला भेटायचं असेल तर जाता येतं.एवढी काळजी रवांडा देशानं घेतलीय.कोरोना व्हायरस महामारी म्हणून जाहीर करण्यात आलाय.त्याच्याच धसक्याने सावधगिरी बाळगण्यात आलीय.

हे ही वाचा :  पिल्लांसाठी खारुताई कोब्राशी लढली !

व्हिडीओ आता व्हायरल केला जातोय.सगळीकडेच वॉश बेसिनच दिसतायत.लोकही वॉश बेसिनचा वापर करतायत.पाण्यासाठी खाली छोटीशी टाकी ठेवलीय.पायाने पंप मारला की पाणीही येतं.त्यामुळे कुणीही या वॉश बेसिनचा वापर करू शकता.पण, हे सगळं नक्की कुठे सुरूय.याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.

  • व्हायरल सत्य
  • मध्य आफ्रिकेतील रवांडामध्ये कोरोनाबद्दल खबरदारी घेण्यात आलीय
  • रवांडामध्ये हात धुण्यासाठी सगळीकडेच वॉश बेसिन लावलेयत
  • शहरातील रस्त्यांवर,फुटपाथ, बस स्टँड, बँक, रेस्टॉरंट आणि दुकानाबाहेर वॉश बेसिन लावलेत

व्हिडीओ पाहा : कोरोनाच्या भीतीने सगळीकडे लावले वॉश बेसिन, मिनिटा मिनिटाला बेसिनमध्ये लोक धुतात हात

सध्या तरी रवांडामध्ये कोरोनाचा एकही पेशंट नाहीये.बाजूचा देश कॉन्गोमध्ये एक पेशंट आढळून आलाय.त्यामुळं खबरदारी म्हणून रवांडा देशानं सगळीकडेच स्वच्छतेसाठी वॉश बेसिन लावलेयत.लोकंही त्याचा वापर करतायत.त्यामुळे आपणही अशा प्रकारे स्वत:ची काळजी घ्यायला हवी.

web title : viral satya corona wash besin hands before getting rawanda africa


संबंधित बातम्या

Saam TV Live