Viral | डायनासोर बनून लोक का फिरतायत रस्त्यावर ?

संदीप चव्हाण
शुक्रवार, 20 मार्च 2020

लॉकडाऊन देशात बाहेर फिरणं मुश्कील झालंय.त्यामुळं लोक बाहेर फिरण्यासाठी अनेक युक्त्या करतायत.कचरा फेकण्यासाठी, प्राण्यांना बाहेर फिरवण्यासाठी लोक आपण प्राणी दिसू असे कपडे घालतायत.नक्की काय करतायत हे लोक वाचा सविस्तर.

कोरोनामुळे काही देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय.त्यामुळं सगळंच बंद असल्याने कुणीही घराबाहेर पडत नाहीये.पण, असे काही व्हिडीओ आता व्हायरल होतोयत.चक्क रस्त्यावर एक डायनासोर फिरत असल्याचं पाहायला मिळालं.असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतायत.डायनासोर दिसत असलेला ड्रेस घालून लोक प्राण्यांना बाहेर फिरवत असल्याचं दिसतंय.कुणी बाहेर फिरू नये, गर्दी करू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलंय.

हे ही वाचा : कोरोना व्हायरसच्या धसक्याने लोक वाईन शॉपबाहेर

हे सगळे प्रकार युरोपमध्ये पाहायला मिळतायत.या व्हिडीओत डायनासोरसारखा ड्रेस घातलेली व्यक्ती रस्त्यावर फिरत होती.त्यावेळी पोलिसांनी याला पकडलं, आणि घरी जायला सांगितलं.त्यामुळं लोकांना बाहेर पडणं मुश्कील झालंय.पण, घराबाहेर कचरा टाकण्यासाठी लोक असे युक्त्या करू लागलेयत.एका व्हिडीओत व्यक्तीने डायनासोरसारखा ड्रेस घालून कचराकुंडीत कचरा टाकण्यासाठी आलीय.कुणी पाळीव प्राण्यांना बाहेर फिरवण्यासाठी अशा युक्त्या करत असल्याने अनेक व्हिडीओ आता व्हायरल होतायत.

व्हिडीओ पाहा : डायनासोर बनून लोक का फिरतायत रस्त्यावर?

पण,लॉकडाऊन केल्याने अशा प्रकारे बाहेर फिरणं योग्य नाही.सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे.

web title :  viral satya costumes dinosaur while lockdown from coronavirus

 


संबंधित बातम्या

Saam TV Live