विकेटकिपर झालेल्या कुत्र्याचं क्रिकेट पाहिलात का?

संदीप चव्हाण
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

कुत्र्याने कधी क्रिकेट खेळल्याचं पाहिलंय का? चक्क, एक कुत्रा क्रिकेटरसारखाच विकेटकिपिंग करत असल्याचं पाहायला मिळालंय...हा कुत्रा आहे तरी कुठला...? क्रिकेट खेळणं याला कुणी शिकवलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...

कुत्र्याने कधी क्रिकेट खेळल्याचं पाहिलंय का? चक्क, एक कुत्रा क्रिकेटरसारखाच विकेटकिपिंग करत असल्याचं पाहायला मिळालंय...हा कुत्रा आहे तरी कुठला...? क्रिकेट खेळणं याला कुणी शिकवलंय का...? याची आम्ही पडताळणी केली...

मोकळ्या जागेत लहान मुलं क्रिकेट खेळत होती. क्रिकेट खेळत असतानाच मुलांसोबत अजून खेळाडू वाढला. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून चक्क एक कुत्रा होता हो. आम्हीदेखील हे पाहून हबकलो. आश्चर्यचकीत झालो. आम्हालाही याचं नवल वाटलं. चक्क कुत्रा फक्त क्रिकेट खेळत नव्हता. तर त्यानं आपल्या धोनीसारखं विकेटकीपिंगीही केलं. क्रिकेट खेळण्यासाठी आवडीनं हा कुत्रा आला. जणू काय हा कुत्रा यांचा विकेटकीपरच आहे असा फिल्डिंग करु लागला. दोन मुली आणि हा मुलगा खेळत असताना हा कुत्रा क्रिकेट खेळण्यासाठी आला...आणि एखाद्या क्रिकेटरसारखाच हा क्रिकेट खेळू लागला.

हे ही वाचा - https://www.saamtv.com/r-r-beautiful-village-award-scheme-name-patil-9673

कुत्रा चक्क फिल्डिंग करतोय पाहून, एकानं यांचा व्हिडीओ बनवला आणि बघता बघता हा व्हिडीओ जगभर व्हायरल झाला. व्हिडिओत एक मुलगा बॉल टाकतो आणि एक मुलगी बॅटिंग करत असते. त्याचवेळी मुलीनं बॉल मारला आणि कुत्र्याने धावत जाऊन बॉल पकडला. बॉल  गोलंदाजाला दिल्यानंतर तो पुन्हा विकेटकीपरची जबाबदारी पार पाडण्यासाठी येतो. इतकंच नव्हे तर ही मुलगी रन काढू नये म्हणून कुत्र्याने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. एखाद्या क्रिकेटरला लाजवेल असा हा कुत्रा क्रिकेट खेळतोय...

क्रिकेटमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, वेगळं काहीतरी या व्हिडीओतून पाहायला मिळालंय. 44 सेकंदाचा हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय.  हा कुत्रा नक्की आहे तरी कुठला याचाच शोध आता नेटकरी घेतायत.

कुत्रा पाळणं अनेकांना आवडतं. प्रामाणिकपणा या कुत्र्याच्या स्वभावामुळे अनेकजणांना कुत्रा भावतो. फक्त बॉलसोबत कुत्र्याला खेळवल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण आता चक्क बॅट आणि स्टम्पच्या मदतीनं कुत्रा क्रिकेटच्या मैदानात रंगलेला, पहिल्यांदाच पाहायला मिळाला. त्यामुळे तुम्हाला जर का कुत्रा आवडत असेल, तर तुम्ही क्रिकेट खेळणाऱ्या या कुत्र्याच्या नक्कीच प्रेमात पडाल.

पाहा व्हिडीओ - https://www.youtube.com/watch?v=DoFSwd2kYO0


संबंधित बातम्या

Saam TV Live