Viral | दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही?

संदीप चव्हाण
गुरुवार, 5 मार्च 2020

दारू पिणं आरोग्यास हानिकारक.तरीदेखील दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही असा दावा केला जातोय.पण, खरंच दारूने कोरोना व्हायरसचा धोका नाही का? याची आम्ही पडताळणी केली.

कोरोना व्हायरसनं चीनमध्येच नव्हे तर जगभरात थैमान घातलाय.अजूनही कोरोनावर औषध सापडलेलं नाही.पण, कोरोना व्हायरस झालेल्या पेशंटवर काय उपचार करावा हे सोशल मीडियावरून सांगितलं जातंय.लोक वाट्टेल ते बोलू लागलेयत.डेटॉलमुळे कोरोना बरा होतो असाही दावा केला होता.पण, आता हद्दच पार केली.दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असा दावा करण्यात आलाय.हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना खरं वाटू लागलंय.त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

  • काय आहे व्हायरल मेसेज ?

दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही.अल्कोहोलची कोरोना व्हायरसला एलर्जी आहे

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.याबद्दल अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात.आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले.त्यांना मेसेज दाखवला आणि दारुमुळे कोरोनाचा धोका नाही का हे जाणून घेतलं.दारू पिणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही.कोरोनावर अजून औषध उपलब्ध नसल्याने असे मेसेज वाचून आपण काय काळजी घ्यायला हवी हेदेखील जाणून घेतलं.त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं.आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव वावरे यांनी काय सांगितलं पाहुयात...

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • दारूचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही
  • दारू पिल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो, ही अफवा
  • नागरीकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये
  • कोरोनावर अजूनही प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक औषधे उपलब्ध नाही

दारू ही आरोग्यास हानिकारक आहे.त्यामुळं असे मेसेज व्हायरल करून चुकीची माहिती देणं योग्य नाही.व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका.आमच्या पडताळणीत दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही हा दावा असत्य ठरला.

web title : Viral satya drink alcohol there is no risk of corona virus 


संबंधित बातम्या

Saam TV Live