Viral | ...म्हणून हत्तीचं पिल्लू पाच तास रडत बसलं !

संदीप चव्हाण
शनिवार, 7 मार्च 2020

हत्त्तीणी आणि तिच्या पिल्लाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.त्या व्हिडीओत हत्तीणीचं पिल्लू रडत असल्याचं दिसतंय.पण, माणसांप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात का ? याची आम्ही पडताळणी केली.

माणसासारख्याच भावना कोणत्याही प्राण्यांना नसतात असं म्हटलं जातं.मात्र प्राण्यांवर रिसर्च केल्यानंतर प्राण्यांनाही माणसाप्रमाणेच भावना असल्याचं सिद्ध झालंय.प्राण्यांनाही विरहामुळं दु:ख होतं हे दाखवणारा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडीओत हत्तीणीने जवळ घेण्यास नकार दिल्यानं चक्क हत्तीचं पिल्लू जवळपाच पाच तास रडत होतं.हा सगळा प्रकार चीनमधील शेंडीयॅशॅन वन्यप्राणी संवर्धन केंद्रामध्ये व्हिडीओ शूट करण्यात आलाय.

हे ही वाचा : कोरोनापासून बचावासाठी 'बॅटमॅन' सूट !

हत्तीणी आणि तिच्या पिल्लामध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला होता.त्यानंतर रागावलेल्या हत्तीणीने पिल्लावर हल्ला करत त्याला जखमी केलं.मात्र, पिल्लू नंतर आईच्या जवळ जाऊ लागलं तेव्हा तिने त्याला स्वीकारण्यास नकार दिला.सामान्यपणे हत्तीणी गरोदर असते तेव्हा बाळंतपणाच्या वेळी तिला खूप त्रास सहन करावा लागतो.अशावेळी कळपातील सदस्य हत्तीणीसोबत राहून हत्तीणीला आधार देतात.पण, या पिल्लाला त्याच्या आईने नाकारल्यानंतर पिल्लू जवळजवळ पाच तास रडत होतं.

व्हिडीओ पाहा : ...म्हणून 5 तास रडत बसलं हत्तीणीचं पिल्लू

आपल्या बाळाला नाकारल्यानंतर हत्तीणीलाही नैराश्य आल्याने तिनेही खाणंपिणं सोडून दिलं होतं.असं हत्तीणीचं पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.हत्ती हे माणसांप्रमाणेच असतात, त्यांनाही भावनिक आधाराची गरज असते असं रिसर्चमधून समोर आलंय.त्यामुळं आता हा जुन्हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.

web title : Viral satya elephant crying cctv


संबंधित बातम्या

Saam TV Live