Viral | कोरोनाची व्हायरसची टेस्ट कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते ?

संदीप चव्हाण
शुक्रवार, 20 मार्च 2020

 

कोरोनाची टेस्ट कुठे कुठे केली जाते या हॉस्पिटलची लिस्ट सध्या व्हायरल होतेय.लिस्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील हॉस्पिटलची नावं आहेत.पण, खरंच या लिस्टमध्ये दिलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट होते का ? याची आम्ही सत्यता जाणून घेतली.

ताप जरी आला तरी लोक घाबरू लागलेयत.डॉक्टरकडे जाऊ की नको याचाच विचार करू लागलेयत.त्यातच आता कोरोना व्हायरस रक्त तपासणी करण्यात येत असलेल्या महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होतेय.कोरोना व्हायरसची भीती जगभरात पसरलीय.याचाच गैरफायदा घेत काही समाजकंठक घेतायत.आता एक हॉस्पिटलच्या यादींचा मेसेज व्हायरल होतोय.या मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल मेसेज ?
  • कोरोना व्हायरसची रक्त तपासणी केली जाणारी हॉस्पिटलची यादी आहे.या यादीतील हॉस्पिटलमध्ये कोरोनाची रक्त तपासणी केली जाते

हे ही वाचा : दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो ?

 हा मेसेज व्हायरल करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय.ही लिस्ट व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय का ? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.याबाबत आरोग्य विभागाकडे माहिती मिळू शकते त्यामुळं आमचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांना भेटले आणि याबद्दल अधिक माहिती मिळवली. महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात.अजून काही दिवसात ही सुविधा वाढवली जाईल असंही सांगितलं जातंय.

या व्हायरल मेसेज बद्दल आरोग्य विभागानेही खुलासा केलाय.त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही
  • रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो
  • कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा
                                                                                  व्हिडीओ पाहा : कोरोनाची टेस्ट कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते ? 
                                                                                    कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आलंय.नागरिकांनी अशा चुकीच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.त्यामुळे आमच्या पडताळणीत कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या लिस्टचा मेसेजमधील दावा असत्य ठरला.                                                 web title : viral satya fake list corona test hospital

संबंधित बातम्या

Saam TV Live