Viral | कोरोनामुळे माकडांवर उपासमारीची वेळ

संदीप चव्हाण
शनिवार, 14 मार्च 2020

कोरोनामुळे माणसांनाच नव्हे तर त्याचा फटका प्राण्यांनाही बसलाय.कोरोनामुळे हजारो माकडं एकमेकांवर हल्ला करतायत.नक्की काय झालंय माकडांना वाचा सविस्तर.

कोरोनामुळे प्राण्यांनाही फटका बसू लागलाय.भूकेलेली माकडं खाऊच्या शोधात इकडे तिकडे भटकतायत.त्यांना काहीच खायला मिळत नसल्याने वस्तीत फिरतायत.त्याचवेळी एकाने केळी खायला टाकली.त्यावेळी मात्र, हजारो माकडं एकमेकांवर तुटून पडली.केळी मिळवण्यासाठी माकडांची झुंबड उडाली आणि या रस्त्यावरच माकडांची हाणामारी सुरू झाली.हजारो माकड वस्तीत वणवण फिरतायत.पण, कुणीच घराबाहेर पडत नसल्याने, पर्यटक येत नसल्यामुळे माकडांचे हाल होतायत.कोरोनाच्या धसक्याने कुणीही बाहेर पडत नसल्याने माकडांवर उपासमारीची वेळ आलीय.

हे ही वाचा : ...म्हणून हत्तीचं पिल्लू पाच तास रडत बसलं !

धक्कादायक व्हिडीओ थायलंडच्या लॉप बुरी जिल्ह्यातील आहे.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत.इथे मोठ्या संख्येन भाविक या ठिकाणी येत असतात.पण, कोरोनामुळं सावधगिरी म्हणून पर्यटक येत नाहीयेत.त्यामुळे माकडांना जगणं मुश्कील झालंय.कुणीही काही खायला दिलं तरी सगळी माकडं एकमेकांवर तुटून पडतात.

व्हिडीओ पाहा : कोरोनामुळे प्राण्यांवर उपासमारीची वेळ? हजारो माकडं एकमेकांना भिडली!

खाऊ काढून घेण्यासाठी माकडं हाणामारी करतायत.खायला मिळालं नाही तर ही माकडं माणसांवरही हल्ला करू शकतात.त्यामुळे यावर आधीच उपाय करणं गरजेचं आहे.हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून, कोरोनामुळं प्राण्यांवर ही परिस्थिती बेतल्याचं बोललं जातंय.

web title : viral satya hundred monkey fight food 


संबंधित बातम्या

Saam TV Live