धक्कादायक : कोविड विषाणूचा जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याचा चीनचा होता इरादा!

धक्कादायक : कोविड विषाणूचा जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याचा चीनचा होता इरादा!
China was thinking to use corona virus as biologial weapon

नवी दिल्ली : जगभरात कोरोना Corona महामारी येण्याच्या पाच वर्षे आधी चीनचे China शास्त्रज्ञ सार्स कोरोना Sars Covid विषाणूचा वापर अस्त्र म्हणून करण्याबाबत विचार विनिमय करत असल्याचा गौप्यस्फोट 'विकेंड आॅस्ट्रलियन' या नियतकालिकाने केला आहे. चीनचे शास्त्रज्ञ Scintists आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी तयार केलेले एक 'सिक्रेट डाॅक्युमेट' हाती लागल्याचा दावा या नियतकालिकाने केला आहे. China Discussed use of Covid Sars Virus as Biological Weapon

आज जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगातले अनेक देश अद्यापही लाॅकडाऊनमध्ये आहेत. भारतालाही India या महामारीचा Corona Pandemic मोठा फटका बसला आहे. एकट्या भारतात आजपर्यंत २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत या विषाणूने २ लाख ४६ हजार ११६ बळी घेतले असून अद्यापही ३७ लाख ४५ हजार २३७ अॅक्टिव्ह केसेस देशात आहेत. आपला देश गेल्या वर्षांपासून या विषाणूशी लढतो आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला हे डाॅक्युमेंट मिळाले असून चीनचे अधिकारी कोरोना विषाणूचा जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याबाबत विचार विनिमय करत होते, असे या कागदपत्रांवरुन उघड होत असल्याचा दावा  'विकेंड आॅस्ट्रलियन' ने केला आहे. चीनचे सैन्यदल 'पीएलए' चे हे अधिकृत डाॅक्युमेट असल्याचाही दावा  'विकेंड आॅस्ट्रलियन' ने केला आहे. या विषाणूत कृत्रिमरित्या बदल करुन त्याचे मानवी शरिरात आजारपण पसरवणाऱ्या विषाणूत रुपांतर करता येऊ शकेल, असे चीनच्या अधिकाऱ्यांनी या डाॅक्युमेंटमध्ये नोंदवल्याचेही  'विकेंड आॅस्ट्रलियन' ने म्हटले आहे. China Discussed use of Covid Sars Virus as Biological Weapon

या कागदपत्रात अमेरिकेच्या हवाईदलाचे अधिकारी कर्नल मायकेल जे. के. यांनी व्यक्त केलेल्या मताबाबतही चर्चा करण्यात आली आहे. तिसरे महायुद्ध जैविक अस्त्रांनी खेळले जाऊ शकते, असे विधान मायकेल जे. के. यांनी केले होते. त्याबाबतही चीनी अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती, असे  'विकेंड आॅस्ट्रलियन' च्या वृत्तात म्हटले आहे. 

Edited By - Amit Golwalkar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com