पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोरोना संसर्गात वाढ..

पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोरोना संसर्गात वाढ..
Uddhav Thackeray - Prashant Paricharak

पंढरपूर : पंढरपूर  मंगळवेढा Pandharpur Mangalwedha विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच  पार पडली.त्या नंतर  या दोन्ही तालुक्यात करोना Corona रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. काल एकाच दिवसात २४२नवे रूग्ण आढळून आले तर १० रूग्णांचा मृत्यु झाला आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे  येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले  आहे. Corona Increased after Pandharpur Mangalwedha Bi Election

वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यसाठी मंजूर लसी Corona Vaccine पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray , उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar व आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे पत्र आ.परिचारक यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन्ही तालुक्यातील करोना रुग्णांच्या वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर Solapur जिल्ह्यत सर्वाधिक करोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत.आज पर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे.

दरम्यान पंढरपूर—मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडल्यामुळे लोकांचा एकमेकाशी मोठय़ा प्रमाणात संपर्क आला आहे. याचा परिणाम म्हणजे केवळ मागील सात दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत.करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी सोलापूर जिल्ह्यस मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात, अशी मागणी आ.परिचारक यांनी केली आहे. Corona Increased after Pandharpur Mangalwedha Bi Election

या दोन तालुक्यात लस कमी प्रमाणात येत असल्याने नागरिक आरोग्य केंद्रामधून माघारी जात आहेत. यासाठी पंढरपूर व मंगळवेढा येथे दोन लसीकरण केंद्र वाढवावेत व जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com