अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा लैंगिकअत्याचार

अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा लैंगिकअत्याचार
Sexual Abuse

डोंबिवली : एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर Girl शेजारी राहणाऱ्या 59 वर्षीय वृद्ध व्यक्तीने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर जबरी अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे . Kalyan Senior Citizen arrested fro Sexually abusing girl

अजित दोषी (59,रा.गोग्रासवाडी) असे नराधामाचे नाव असून त्याला टिळकनगर पोलिसांनी Police अटक केली असून सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या नाराधम अजितने तिच्या घरी कोणीही नसताना जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केले व यांची वाच्यता कुठे केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

हे देखिल पहा - 

पीडित मुलीगी घरात घाबरलेली असताना आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता आरोपी अजितने आपल्याला हाताच्या चापटीने मारहाण केली व मोबाईल मध्ये चित्रफीत तयार करून कोणाला तरी पाठवले आहे असे सांगून व यासंदर्भात आई- वडिलांना सांगितले असता ठार मारण्याची धमकी दिली, असे या मुलीने सांगितले.Kalyan Senior Citizen arrested fro Sexually abusing girl

हा सर्व प्रकार मुलीने आईला सांगितला असता, त्यांनी तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.पोलीसांनी याप्रकरणी अजित दोषी या नराधमाला अटक केली व कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.अशी माहिती तपास अधिकारी विनोद कडलक यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com