बेकायदेशीर बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकायदेशीर बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Illegal Bullock Cart race in Pune District

पुणे : भोर तालुक्यातील देगाव परिसरात बंदी असतानाही बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Offence Registered in Bhor Pune District for Illegal Bullock Cart

हे देखिल पहा -

भोर तालुक्यातील देगाव परिसरात बैलगाडा शर्यतेचे आयोजित करण्यात आले होते. विकेंड लॉकडाऊनचा फायदा घेत गपचुप गाव बाहेरील माळरानावर शर्यती भरवण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी पोलीस येताच अनेकांनी पळ काढला. पोलिसांच्या हाती लागलेल्या आयोजन आणि शर्यतीत सहभागी झालेल्या अशा चार जणांवर राजगड पोलिसांनी कारवाई केली आहे. 

या शर्यतीत जवळपास तीस ते पस्तीस बैल गाडा मालक सहभागी झाले होते. आता पोलीस आयोजन आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाचा शोध घेत आहेत. देशात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. त्यात कोरोनाचेही सावट आहे, अशा परिस्थितीत ही शर्यत भरविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. Offence Registered in Bhor Pune District for Illegal Bullock Cart
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com