लाॅकडाऊनमध्ये पत्नीच्या मैत्रीणीबरोबरचा फेरफटका 'त्याला' पडला महागात

लाॅकडाऊनमध्ये पत्नीच्या मैत्रीणीबरोबरचा फेरफटका 'त्याला' पडला महागात
Husband Wife Quarrel

पुणे : सातत्याने पुणे पोलिसांनी Pune Police सांगुनही काही पुणेकर संचारबंदीच्या Curfew काळात काहीही कारणे सांगुन बाहेर पडतात. पण असाच एक वेगळा किस्सा या संचारबंदीच्या काळात बालगंधर्व चौकात पोलिसांना कळला. पण त्या किश्श्यामुळे आता एका कुटुंबात चांगलीच भांडणं लागली. Police Caught Man with Wifes friend in Lock  Down at Pune

वेळ गुरुवारी चार ची...नेहमीप्रमाणे पोलिस संचारबंदीच्या काळात जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतात त्याच्यावर बालगंधर्व रंगमंदिराच्या Balgandharva Rang Mandir कारवाई करत होते.त्या दरम्यान एक जोडपे चाकणहुन बालगंधर्व रंगमंदिराच्या चौकात चारचाकी ने आले .त्यांना त्यावेळी पोलिसांनी अडविल्यानतंर गाडीमध्ये एक जोडपे दिसून आले.

हे देखिल पहा

पोलिसांनी चौकशी करायला सुरवात केल्यानतंर त्यातील पुरुषाने स्वतःच्या बायकोला आणायला जायचे आहे. असे सांगितले. तेव्हा पोलिसांनी मग ही स्त्री कोण असे विचारल्यानतंर ती माझ्या पत्नीची मैत्रिण असल्याचे सांगितले. Police Caught Man with Wifes friend in Lock  Down at Pune

....मग काय ..पोलिसांनी परत एकदा कसुन चौकशी केली. असणारा दंडही त्यांना सांगितला ..शिवाय ठोस कारण न देता संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरायला सांगितले..इतके सांगुनही त्यांनी पोलिसांना खोटी कारणे दिली. शिवाय आता दंड भरायला पैसे नसल्याचे पोलिसांना सांगितले.

सुमारे पाऊण तास ते जोडपे तिथेच थांबुन होते. अखेर पोलिसांनी त्या पुरुषाच्या बायकोलाच बोलावुन घेतले. ती आली आणि तिनं दंड भरला. पण हे एवढ्यावरच थांबणार नव्हती. Police Caught Man with Wifes friend in Lock  Down at Pune

आपल्या पतीसोबत त्या मैत्रिणाला सोबत बघितल्यानतंर त्या पत्नीचा पारा चढला आणि जाता..जाता त्या स्त्री आपल्या पतीचा भांडाफोड महिला पोलिसांसमोर उघडा केला.. त्या महिलेचा पती हतबल होऊन हे सारं पहात होता.

पुणे पोलिसांनी कसुन चौकशी करुनही संचारबदीच्या काळात अशी खोटी कारणे दिल्यानं खरं कारण काय ते समोर आलं.......त्यामुळे पोलिस खोट सांगणा-यांना कस पकडू शकतात हे दाखवणाराच हा किस्सा....आता त्या कुटुंबात नक्की काय झालं हा मामला मात्र कळू शकला नाही!

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com