देवो के देव...फेम मोहित रैनाची चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

देवो के देव...फेम मोहित रैनाची चौघांविरोधात पोलिसांत तक्रार
Mohit Raina

मुंबई : 'देवो के देव महादेव' फेम मोहित रैना Mohit Raina याने चार जणांविरोधात गोरेगाव पोलिस Police  ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वीच टीव्हीचा 'महादेव', 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'  हा चित्रपट आणि 'भौकाल' 'काफिर' या वेब सीरिजमधून एंटरटेन्मेंट Entertainment इंडस्ट्रीत प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित रैनाबद्दल एक धक्कादायक दावा करण्यात आला होता. TV Actor Mohit Raina Files Complaint with Goregaon Police

हे देखिल पहा

मोहित रैनाबद्दल त्याची कथित स्वयंघोषित शुभचिंतक सारा शर्मा हिने सोशल मीडियावर सेव्ह मोहित मोहीमही चालवली होती. तिच्या म्हणण्यानुसार, माेहितच्या जिवाला धोका आहे. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे मोहित रैनाचा मृत्यू होऊ शकतो.  मात्र कालांतराने मोहितचे घरातले आणि स्वत: मोहितने समोर येऊन मी अगदी फिट आणि फाइन असल्याचे सांगितले. 

या घटनेनंतर मोहितने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार बोरिवली न्यायालयाने संबधित पोलिसांना मोहितचा जबाब नोंदवून तपास करण्याच्या सूचना दिल्या,त्यानुसार गोरेगाव पोलिसांनी मोहितचा जबाब नोंदवून सारा शर्मा आणि तिच्यासोबत परवीन शर्मा, आशिव शर्मा, मिथीलेश तिवारी यांच्याकडून ञास दिल्याचे रैना यांनी तक्रारीत म्हटले आहे. TV Actor Mohit Raina Files Complaint with Goregaon Police

रैना यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या चौघांवर आरोपीं गुन्हेगारी कट रचने, पोलिसांना चुकीची माहिती देणे,  धमकी देणे आणि खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी अधिक तपास गोरेगाव पोलिस करत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com