Viral | बंद झालेली एक हजाराची नोट पुन्हा चलनात आली ?

संदीप चव्हाण
गुरुवार, 5 मार्च 2020

एक हजाराची नवी नोट तुम्ही पाहिलीय का ? एक हजार रुपयांची नवीन नोट पुन्हा चलनात आल्याचा दावा केला जातोय.पण, खरंच हजार रुपयांची नोट चलनात आलीय का ? याची आम्ही पडताळणी केली.

बंद झालेली एक हजार रुपयांची नोट पुन्हा चलनात आलीय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.इतकंच नव्हे तर चलनात आलेली नोट कशी आहे तिचा फोटोही दाखवण्यात आलाय.पण, खरंच एक हजाराची नोट चलनात आलीय का? याची आम्ही पडताळणी केली.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा...

व्हायरल मेसेज
RBI ने 1 हजार रुपयाची नोट जारी केलीय.नवीन नोट पाहा कशी आहे

एक हजार रुपयाच्या नोटेचा फोटो व्हायरल केला जातोय.पण, बंद झालेली हजाराची नोट पुन्हा चलनात आलीय का ? त्यामुळं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पण, ही नोट कधी चलनात आली ? की फक्त सोशल मीडियावरच ही नोट व्हायरल होतेय.याची पडताळणी करण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं आयबीआयकडे चौकशी केली.

काही बँकांनी दोन हजारच्या नोटा देणं बंद केलंय.त्यामुळं आता एक हजाराची नोट येणार असा दावा केला जातोय.पण, ही नोट खरंच आलीय का ? किंवा येणार आहे का? याची पडताळणी करत असताना सरकारनं काही माहिती दिलीय का हे पाहिलं.कुठेही हजाराची नवीन नोट आल्याची माहिती मिळाली नाही.पण, सरकारची धोरणं आणि योजनांबद्दल माहिती देणाऱ्या ट्विटर हँडलवर एक खुलासा करण्यात आला होता.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहा.

  • व्हायरल सत्य
  • एक हजाराची नोट आरबीआयनं जारी केलेली नाही
  • लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जातायत
  • वेगळ्या रंगाची नोट तयार करून ती एक हजाराची नवीन नोट असल्याचा दावा केला

त्यामुळं आमच्या पडताळणीत एक हजार रुपयाची नवीन नोट चलनात आल्याचा दावा असत्य ठरला.पण, हा फोटो व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय.त्यामुळं तुम्ही अशा व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवू नका.

web title : viral satya one thousand note currency


संबंधित बातम्या

Saam TV Live