Viral | लहान मुलाला का मारतायत दिल्ली पोलिस ?

संदीप चव्हाण
गुरुवार, 5 मार्च 2020

दिल्ली पोलिसांच्या नावाने एक फोटो व्हायरल होतोय.त्या फोटोत एक व्यक्ती लहान मुलाला काठीने मारत असल्याचं दिसतंय.पण, ही व्यक्ती खरंच दिल्ली पोलिस आहे का? याची आम्ही पडताळणी केली.

काही दिवसांपूर्वी दिल्ली हिंसाचार झाला.त्यानंतर अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले.नक्की व्हिडीओ कुठले आहेत फोटो कुठले आहेत ते कळत नव्हतं.पण, दिल्लीत झालेला हिंसाचार असल्याचा दावा करून व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले होते.पण, आता एक फोटो व्हायरल होतोय.या फोटोत दिल्ली पोलिस कर्मचारी या मुलाला मारत असल्याचा दावा करण्यात आलाय.पण, खरंच हे दिल्लीतील पोलिस आहेत का? फोटो व्हायरल होत असल्याने पोलिसांबद्दल रोष व्यक्त केला जातोय.त्यामुळे हे दिल्लीतीलच पोलिस आहेत का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.

हे ही वाचा- होळीच्या रंगात कोरोना व्हायरस ?

या फोटोत पोलिस कर्मचारी लहान मुलाला मारहाण करताना दिसत आहेत.लहान मुलगाही पोलिसांना घाबरल्याचं दिसत असल्याने दिल्ली पोलिसांची दहशत असल्याचा दावा करण्यात आला.आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

  •  काय आहे फोटोमागचं व्हायरल सत्य ?
  • हा फोटो दिल्लीमधील हिंसाचाराचा नाही, फोटो दहा वर्षे जुना आहे
  • फोटोत दिसणारे दिल्ली पोलिस नसून, बांगलादेशमधील आहे
  • कमी पगार मिळत असल्याने ढाका येथे कामगारांनी आंदोलन केलं होतं
  • आंदोलन सुरू असताना पोलिस लहान मुलाला काठीचा धाक दाखवत होते

व्हिडीओ पाहा : दिल्ली पोलिस मुलाला का मारतायत ?

हा फोटो शेअर करून दिल्ली पोलिसांची दहशत असा दावा केला होता.पण, दिल्लीतील नसून, बांगलादेशातील आहे.2010 साली कापडा कामगारांनी आंदोलन केलं होतं.या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी अश्रूधूर, पाण्याचा वापर केला होता.अनेक लहान मुलंही सहभागी झाली होती.त्यावेळीचा हा फोटो आता व्हायरल करून दिल्ली पोलिसांना बदनाम केलं जातंय.पण, आमच्या पडताळणीत दिल्ली पोलिस लहान मुलाला मारत असल्याचा दावा असत्य ठरला.

web title : viral satya photo showing brutality of delhi police


संबंधित बातम्या

Saam TV Live