'रेड डॉट टेस्ट'ने घरच्या घरी डोळ्यांची तपासणी करणं कसं काय शक्य ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 मार्च 2020

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय.त्या मेसेजमध्ये दावा केलाय की घरच्या घरी तुम्ही तुमचे डोळे तपासू शकता.घरच्या घरी डोळे कसे तपासायचे तेही सांगण्यात आलंय.पण, एका डॉटने घरीच डोळे तपासणं शक्य आहे का ? याची आम्ही पडताळणी केली.

लाल रंगाचा डॉट आहे. लाल रंगाच्या डॉटने डोळ्यांची तपासणी करू शकतो असा दावा करण्यात आलाय.पण, अशा पद्धतीने डोळ्यांची तपासणी करणं योग्य आहे का ? याची आम्ही पडताळणी सुरू केली.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

हे ही वाचा : https://www.saamtv.com/video-how-does-bike-start-sound-9760

व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ?
लाल गोळ्याजवळ पाहिल्यावर 88 नंबर दिसला तर आपला डावा डोळा कमजोर आहे.83 नंबर दिसला तर उजवा डोळा कमजोर आहे.38 नंबर दिसला तर दोन्हीही डोळ्यांची दृष्टी चांगली.पण, 33 नंबर दिसला तर डोळे डॉक्टरांकडून तपासून घ्या

हा मेसेजमध्ये दावा केल्याने कित्येकांनी यावर विश्वास ठेवलाय.अनेकजण डोळे घरच्या घरीच तपासून पाहतायत.पण, खरंच अशा पद्धतीने डोळ्यांची तपासणी घरच्या घरी करू शकतो का ? नंबर असे दिसले तर नजर कमी झालीय की दृष्टी चांगली आहे हे ओळखू शकतो का ? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.आमच्या प्रतिनिधी नेत्रचितित्सकांना भेटल्या.त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि रेड डॉट टेस्टने डोळे तपासणं योग्य आहे का? याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.त्यावेळी तज्ज्ञांनी रेड डॉट टेस्टने डोळ्यांची तपासणी करणं योग्य नसल्याचं सांगितलं.डोळ्यांचे डॉक्टर अशा पद्धतीने डोळे तपासत नाहीत.त्यामुळं घरच्या घरी डोळ्यांची तपासणी करणं चुकीचं असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय.त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • *डोळ्यांची तपासणी वेगवेगळ्या मशिनद्वारे केली जाते
  • *डोळ्यांचे डॉक्टर कुठल्याही रेड डॉट टेस्ट गोळ्याचा वापर करत नाहीत
  • *स्नेलेन्स चार्टच्या माध्यमातून, निअर व्हिजन चार्ट
  • *कलर व्हिजन चार्ट माध्यमातून डोळे तपासले जातात
  • *लोकांनी स्वतः काही टेस्ट करून काहीही ठरवू नये

आमच्या पडताळणीत रेड डॉट टेस्टने डोळ्यांची तपासणी केली जाते हा दावा असत्य ठरला.डोळ्यांची तपासणी करायची असल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.व्हायरल मेसेज पाहून घरच्या घरी डोळे तपासणी करू नका.

व्हिडीओ पाहा : https://www.youtube.com/watch?v=kx0W5UXDozw

web title : viral satya red dot test eye viral msg 


संबंधित बातम्या

Saam TV Live