Viral | टिकटॉकचं सॉल्ट चॅलेंज घेईल तुमचा जीव ?

संदीप चव्हाण
शुक्रवार, 6 मार्च 2020

टिकटॉकवर एकापेक्षा खरतनाक चॅलेंज येतायत.आता तर भयानक चॅलेंज आलंय.या चॅलेंजनं जीवही जाऊ शकतो.अनेक व्हिडीओ व्हायरल करून चॅलेंज कसं आहे हे दाखवलं जातं. पण, हे चॅलेंज काही कामाची नसतात, उलट आपल्या जीवावर बेतू शकतात.त्यामुळे असे चॅलेंज स्वीकारताना विचार करा.

टिकटॉकवर दिवसेंदिवस भयंकर चॅलेंज येतायत.यातच आता एक भयंकर सॉल्ट चॅलेंज आलंय.हे चॅलेंज दिसायला जरी मजेशीर असलं तरी आपला जीव घेऊ शकतं.सध्या व्हायरल होत असलेले हे चॅलेंज आहे सॉल्ट चॅलेंज.व्हिडीओ बनवत असताना तोंडात मावेल एवढं मीठ खाल्लं जातं.पण, एवढं खारट मीठ खाणं कितपत योग्य? अतिप्रमाणात मिठाचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक आहे.तरीदेखील असे जीवघेणे स्टंट केले जातायत.

हे ही वाचा : अंगावर स्प्रे मारून कोरोना व्हायरस पेशंटला पकडतात ? 

याआधी टिकटॉकवर स्कलब्रेक चॅलेंज आलं होतं.त्यानंतर आलेल्या या सॉल्ट चॅलेंजने सगळ्यांची झोप उडवलीय.या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी युझरना खूप मीठ खावं लागतं.तोंडात जास्तीत जास्त मीठ भरल्यानंतर, शेवटी ते बाहेरही काढावे लागते.मात्र काही वेळा हे मीठ गिळल्यामुळे तुमच्या जीवालाही धोका पोहचू शकतो.या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी खूप प्रमाणात मीठ खाणं ही अट आहे.खूप मीठ खाल्ल्यामुळे ते हानिकारक ठरू शकतं.पण, यामुळं काय दुष्परिणाम होऊ शकतात वाचा.

  • सॉल्ट चॅलेंजचे दुष्परिणाम काय?
  • आतड्यांमध्ये मीठ गेल्यास तुमच्या जीवावरही बेतू शकतं
  • मीठ बाहेर काढत असले तरी, पुरेशाप्रमाणात मीठ तोंडात असते. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते
  • या आजारपणामुळे तहान, चक्कर येणे किंवा उलट्या होऊ शकतात 
  • हार्ट ऍटॅक, उच्च रक्तदाब, डोकेदुखी आणि मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे दिसू शकतात

व्हिडीओ पाहा : टिकटॉकचं सॉल्ट चॅलेंज घेईल तुमचा जीव ?

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे जीवघेणे स्टंट करू नका.या स्टंटमुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही.तर ते फक्त जीवच घेऊ शकतात.त्यामुळे असं स्टंट करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा.

web title : viral satya tiktok salt challenge


संबंधित बातम्या

Saam TV Live