viral satya - टिकटॉक व्हिडीओसाठी जीवघेणा स्टंट, जीव थोडक्यात वाचला

संदीप चव्हाण
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

अलीकडे टिकटॉकची क्रेझ चांगलीच वाढलीय.टिकटॉकच्या नादात आपला जीवही जाऊ शकतो याचं भानही राहिलेलं नाही.टिकटॉक स्टारनं व्हिडीओ बनवण्यासाठी असाच एक जीवघेणा स्टंट केला आणि त्याच्यासोबत काय घडलं ते वाचा. 

हे ही वाचा-https://www.saamtv.com/egg-farming-open-fields-fields-9692

अलीकडे टिकटॉकची क्रेझ चांगलीच वाढलीय.टिकटॉकच्या नादात आपला जीवही जाऊ शकतो याचं भानही राहिलेलं नाही.टिकटॉक स्टारनं व्हिडीओ बनवण्यासाठी असाच एक जीवघेणा स्टंट केला आणि त्याच्यासोबत काय घडलं ते वाचा. 

हे ही वाचा-https://www.saamtv.com/egg-farming-open-fields-fields-9692

जीव गेला तरी चालेल, पण टिकटॉकवर लोकप्रिय होण्यासाठी माणूस कोणत्याही थरार जातोय.आतापर्यंत अनेकांनी टिकटॉकच्या नादात जीव गमावलाय.पण तरीही लोक स्टंट करणं सोडत नाहीत.असाच एक स्टंट टिकटॉक स्टार जेसेन क्लार्कच्या जीवावर बेतला असता.जेसेन क्लार्कने स्टंट करण्यासाठी बर्फ साचलेल्या नदीत गेला.बर्फ जमलेल्या पाण्यात तो उतरला आणि बर्फाच्या खाली पोहायचं क्लार्कनं धाडस केलं. थोड्यावेळाने बर्फाच्या चादरीखाली पोहायला सुरवात केली.एक व्यक्ती याचा व्हिडीओ बनवत होती.तर त्याचा कुत्राही सोबत होता.बर्फाखाली जाऊन यानं पोहायला सुरूवात केली.पण, थोड्या वेळानंतर त्याला बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नव्हता.जीव गुदमरत असल्याने हाताने बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला.पण, बर्फही फुटत नसल्याने हा सगळा प्रकार जीवावर बेतला होता.

कुत्रा भुंकत होता.दुसरी व्यक्ती व्हिडीओ बनवत होती.पण, याला मदत केली नाही.अखेर काही वेळानंतर याला बाहेर पडण्याचा रस्ता सापडला.पाण्याबाहेर येताच जोरजोरात श्वास घेऊ लागला.पुन्हा एकदा पाहा बर्फाखाली पोहत असताना याची काय अवस्था झाली.अखेरच्या क्षणी त्याला बाहेर पडणार नाही असं वाटत असतानाच, तो या बर्फाच्या भुल भुलैय्यातून बाहेर पडला. 
 

जेसननं स्वत: हा व्हिडीओ शेअर केलाय.आजपर्यंत आपण मृत्यूला इतक्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं असं जेसन म्हणाला.पाण्याच्यावर बर्फ असल्यानं काहीच समजत नव्हतं असं त्यानं सांगितलं.जेसनचा हा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल होतोय.पण तुम्ही असा प्रयत्न मुळीच करू नका.नाहीतर नसत्या लोकप्रियतेच्या नादात जीवही जाऊ शकतो.

व्हिडीओ पाहा- https://www.youtube.com/watch?v=CdIiBI83Gcc

टिकटॉक एवढे लोक वापरतात, फावल्या वेळात टिकटॉकवर अनेकजण व्हिडीओ बनवतात.ऍक्टिंग करण्याची संधी ज्यांना मिळाली नाहीये त्यांना टिकटॉकवर आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळालीय.पण, याचा उपयोग चांगल्या कामांसाठीच व्हायला हवा.नको ते स्टंट करून जीवाशी खेळ खेळणं योग्य नव्हे.त्यामुळं तु्ही जर टिकटॉक वापरत असाल तर चांगल्या कामासाठीच त्याचा वापर करा.


संबंधित बातम्या

Saam TV Live