Viral | WhatsApp चं अखेर डार्क मोड फीचर झालं लाँच

संदीप चव्हाण
शुक्रवार, 6 मार्च 2020

तुम्ही व्हॉट्सऍप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी.कारण, चॅटिंग करताना डोळ्यांना त्रास नको, बॅटरी जास्तवेळ टिकावी यासाठी नवीन फीचर लॉन्च केलंय.कोणतं आहे ते फीचर? आपल्या मोबाईलमध्ये कसं सुरू करायचं वाचा सविस्तर. 

व्हॉट्सऍपचं डार्क मोड फीचर लाँच झालंय.आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी फीचर उपलब्ध आहे.WhatsApp ने Dark Mode फीचर आणल्याने आता चॅटिंग करताना आणखी मजा येणाराय.व्हॉट्सऍपचे डार्क फीचर कमी प्रकाशात चांगली व्हिजिबिलिटी देते.त्यामुळे युजर्संच्या डोळ्यांना त्रास होत नाही.इतकंच नव्हे तर आपल्या सोयीनुसार डार्क मोड किंवा व्हाईट मोड या फीचरचा वापर करू शकता.पण, मोबाईलमध्ये डार्कमोड फीचर कसं सुरू करतात पाहुयात व्हिडीओ.

व्हिडीओ पाहा : 

 

तुमच्या मोबाईलमध्ये हे फीचर दिसत नसेल तर व्हॉट्सऍप अपडेट करावं लागेल.तेव्हा तुम्ही व्हॉट्सऍप सेटिंगमध्ये जाऊन डार्कमोडचा वापर करू शकता.यामुळे मोबाईलची बॅटरी जास्तवेळ चालेल आणि डोळ्यांनाही त्रास होणार नाही.

web title : viral satya Whats App dark mode feature launched


संबंधित बातम्या

Saam TV Live