आजी बाहेर जाऊ नको , कोरोना होईल.... चिमुकलीची आर्त विनवणी

प्रसाद नायगावकर
बुधवार, 21 एप्रिल 2021

आजीचा  पदर धरून बाहेर पडणाऱ्या आजीला बाहेर पडू नको ; कोरोना होइल  असं म्हणत एक चिमुकली रडत रडत आर्त स्वरांनी विणवणी करीत आहे.  सावी गावंडे असं या चिमुकलीचे  नाव आहे. हा  व्हिडीओ सोशल माध्यमांवर समोर आला असून सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.

यवतमाळ - आजीचा grandmother पदर धरून बाहेर पडणाऱ्या आजीला बाहेर पडू नको ; कोरोना होइल  असं म्हणत एक चिमुकली रडत रडत आर्त स्वरांनी विणवणी करीत आहे.  सावी गावंडे  असं या चिमुकलीचे  नाव आहे. हा  व्हिडीओ video सोशल माध्यमांवर social media  समोर आला असून सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल viral होताना दिसून येत आहे.viral video of small girl and grandmother

या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळत असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे . एकीकडे कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे .दिवसागणिक कोरोनामुळे मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे . दुसरीकडे राज्य शासनाने state government " ब्रेक द चेन " या नावाखाली अनेक निर्बंध आणले आहे . 

पण नागरिक या निर्बंधाला जुमानतंच नाही असं चित्र सध्या राज्यात दिसत आहे. सर्वत्र रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे . कित्येकजण तर मास्कचा वापर न करताच बाहेर फिरत असल्याचे दृश्य समोर येत आहे . याच कारणांनी कोरोना वाढीचा स्फोट होत असल्याचे दिसून येत आहे .प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे . सरकारने लावलेल्या निर्बंधांना जनतेनी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारणे गरजेचे असताना जनतेनी या निर्बंधांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे . viral video of small girl and grandmother

अशातच एक चिमुकली आपल्या आजीचा पदर धरून बाहेर पडल्यास कोरोना होईल अशी आर्त विणवणी करीत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावलेले आहे . जर एवढ्याश्या चिमुकलीला कळतं तर आपल्याला का वळत  नाही असा प्रश्न समोर उभा राहतो आहे . जर कोरोना पासून वाचायचे असेल तर या गोड चिमुकलीचा सल्ला नक्की पाळा.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live