
लखपती होण्याचं स्वप्न सर्वचजण पाहत असतात. तुम्ही देखील लखपती होण्याचं स्वप्न पाहत असाल आणि त्यासाठी प्रयत्न देखील करत असाल. एका रात्रीत अचानक कुणीतरी लखपती होणे अशक्य आहे. परंतु असंच काहीसं अमेरिकेत राहणाऱ्या एका ७ वर्षाच्या मुलीसोबत घडलंय.
अमेरिकेतील एक ७ वर्षाची मुलगी वाढदिवसाच्या दिवशीच लखपती झाली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की, ७ वर्षाच्या मुलीकडे एवढे पैसे कुठून आले. पण खरंच वाढदिवसाच्या दिवशीच तिला एक हिरा सापडला आहे. याची किंमत जवळपास लाखाच्या घरात आहे.
एका रिपोर्टनुसार, आर्कासना येथील क्रेटर ऑफ डायमंड स्टेट पार्कमध्ये एक मुलगी वाढदिवसानिमित्त फिरायला गेली होती. अस्पेन ब्राउन असं तिचं नाव आहे. वडील आणि आजीसोबत अस्पेन ब्राउन तिचा ७वा वाढदिवस साजरा करत होती. तेव्हा तिला त्या पार्कमध्ये २.९५ कॅरेटचा एक हिरा सापडला.
@Arkansas State Parks या इंस्टाग्राम अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आलीये. 'मोठा रत्न सापडला. पॅरागोल्डच्या सात वर्षीय अस्पेन ब्राउनने १ सप्टेंबर रोजी क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्कला भेट दिली. तिला पार्कमध्ये २.९५ कॅरेटचा सोनेरी तपकिरी हिरा मिळाला. या वर्षी या पार्कमध्ये दुसऱ्यांदा सापडलेला सर्वात मोठा हिरा आहे. याआधी मार्चमध्ये ३.२९ कॅरेटचा हिरा सापडला होता'. असं कॅप्शन लिहिलं आहे.
उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीला खरोखर उद्यानात एक हिरा सापडला आहे.'अस्पेनला एक हिरा सापडला. हा हिरा सोनेरी आणि तपकिरी रंगाचा आहे. या हिऱ्याला कुठेही कोणत्याही प्रकारचे तडे गेले नाहीत. या वर्षी पाहिलेल्या सर्वात सुंदर हिऱ्यापैकी हा सुंदर हिरा आहे'.असं सहाय्यक उद्यान अधीक्षक, वेमन कॉक्स यांनी सांगितले.
या पार्कमध्ये दोन व्यक्ती रोज हिरे शोधण्यासाठी येतात. एका शेतकऱ्याने पहिल्यांदा हा हिरा असल्याचे ओळखले. तेव्हापासून जवळपास या ठिकाणी ७५,००० हिरे सापडले आहे. अशी माहिती उद्यानाने दिली.
या उद्यानात सापडलेला हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. याआधी ३.२९ कॅरेटचा चांदीचे नाणे जर्मनीतील ८ वर्षाच्या मुलाला सापडला होता. हे नाणे जवळपास १००० वर्ष जुने असल्याचे सांगितले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.