
नवनीत तापडिया
Old Man Fight Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन वृद्धांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हा हाणामारीचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील आहे. वृद्धांच्या या फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
नेमकं प्रकरण काय?
मोटरसायकलचा धक्का लागल्यानं दोन वृद्ध व्यक्तींमध्ये सुरुवातीला जोरदार वाद झाला. त्यानंतर हा वाद इतका वाढला की या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. हा व्हिडीओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन वृद्ध व्यक्ती बाईकवरून जात होते. मात्र याचदरम्यान त्यांचा एकोंमेकांना धक्का लागतो आणि त्यामुळे या दोन्ही वृद्धांमध्ये वाद होतो. त्यानंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.
ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच धुमाकूळ घातलात आहे. या व्हिडिओ पाहून अनेक लोक मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहे. एवढा राग त्यांना का आला असेल? अशी विनोदी चर्चा शहरात सुरू आहे. (Viral News)
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध व्यक्ती फ्री-स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसत आहे. धक्का लागल्याच्या कारणातून या दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झालं. हा व्हिडीओ शहरातील नेमका कुठल्या भागातील आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.