Viral Video: बसमध्ये लागली डुलकी; डोक्यावरच आपटला, VIDEO पाहाल तर हसावं की रडावं कळणारच नाही!

Bus Viral Video : एका मुलाचा बसमध्ये झोप घेताना जोरात खाली पडला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv

A Man Fall In Bus While sleeping

सध्या लोकांचे दैनंदिन आयुष्य खूप व्यस्त झाले आहे. काहींची तर झोपही पूर्ण होत नाही. ८ तासांची पुरेशी झोप मिळणंही आता कठीण होत चाललंय. अनेक जण प्रवासात थकवा घालवण्यासाठी एक झोप काढतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही कधी ऑफिसमधून घरी जाताना ट्रेन, बस किंवा मेट्रोमध्ये झोपला आहात का? झोपला असाल तर तुमचा कधी तोल गेलाय का? जर तुमचाही तोल गेला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की रिलेट कराल. सोशल मीडियावर सध्या बसमध्ये झोपलेल्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.

Viral Video
Amchya Pappane Ganpati Aanla: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला..' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

प्रवासात डुलकी येणे. पाच दहा मिनिटांची झोप घेणे ही अगदी सहाजिक गोष्ट आहे. परंतु या झोपेने जर तुम्ही जोरात खाली पडलात किंवा आपटला तर विचारही करवत नाही. असंच एका मुलासोबत घडलंय. बसमध्ये झोपलेला एक मुलगा अचानक तोल गेल्याने जोरात खाली पडला.

प्रवासात अनेक लोक झोपतात. या परंतु या झोपेने जर कोणाला दुखापत झाली किंवा जीवावर बेतलं तर हे खूप धोकादायक ठरू शकतं. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत एक मुलगा बसमध्ये झोपला असताना अचानक तोल जाऊन तो जोरात डोक्यावर पडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये बसमध्ये अनेक प्रवासी आहेत. या मुलाचा व्हिडिओ मागच्या बाजूने शूट केला आहे. मुलगा डोक्यावर खाली पडतो अन् सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात. त्या मुलाला खूप अवघडल्यासारखे झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो मुलगा पुन्हा उठून आपल्या जागेवर बसतो.

अनेकांनी प्रवासात झोपण्याची सवय असते. झोपताना मात्र आपण नेहमी काळजी घ्यायला हवी. प्रवासात एकदम गाढ झोपेत नसावे. त्यामुळे कामाचा ताण कमी करत रोजची ८ तासांची झोप पूर्ण करुनच कामाला सुरुवात करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com