
सोशल मीडियावर आतापर्यंत सापाच्या अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यात. साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर सरकन काटा येतो. मात्र सर्पमित्र जिवाचीपर्वा न करता सापांना जीवनदान देतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका सर्पमित्राचा काळजात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून तुम्हीही सर्पमित्राच्या धाडसाचं कौतुक कराल. (Latest Marathi News)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Video) एका सापाने दुसऱ्या एका लहान सापाला खाल्ल आहे. साप खाल्ल्याचं या सर्पमित्राला समजताच त्याने सापाच्या तोंडातून लहान सापाला बाहेर खेचून काढलं. असं करताना सर्पमित्राने आपल्या जिवाचीपर्वा न करता लहान सापाचा जीव वाचवला. तसेच या दोन्ही सापांना त्याने निसर्ग अधिवासात सोडलं आहे.
@monish_production_ या इंस्टाग्राम अकाउंटवर या व्यक्तीने आपला व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये त्याने लिहिलं आहे की, कळंबुसरे येथे साप (Snake) आढळल्याची माहिती मिळाली. मी तिथे गेल्यावर पाहिलं की, एका मोठ्या धामण सापाने दुसऱ्या एका लहान सापाला अख्ख गिळलं होतं. लहान सापाची शेपटी फक्त बाहेर होती. त्यामुळे मी त्या मोठ्या धामण सापाचं तोंड एका प्लास्टीक गोणीच्या मदतीने पकडलं आणि लहान साप बाहेर खेचून काढला.
साप बाहेर खेचून काढल्यावर लहान साप जिवंत आणि सुखरुप होता. त्यामुळे दोघांनाही त्याने जंगलात सोडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ११ ऑगस्ट रोजी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्हुव्ह्ज मिळालेत.
सोशल मीडियावर सर्पमित्राने दाखवलेल्या या धाडसाचं अनेकांनी कौतुक केलंय तर अनेकांनी यावर टीका केली आहे. सापाच्या तोंडातला घास तुम्ही खेचून काढला, एक सर्पमित्र असं कधीही करणार नाही, अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.