School Students: शाळेच्या बकांचा ढोल अन् कंपास पेटीचा ततड-ततड ताशा; विद्यार्थ्यांचा अफलातून व्हिडीओ व्हायरल

Students Played Drums On Bench Video: बरेच खट्याळ विद्यार्थी शाळेत मधल्या सुट्टीत किंवा ऑफ लेक्चरला अशा करामती करत असतात.
School Students
School StudentsSaam TV

Bihar School Student Viral Video:

शाळा म्हणजे जीवनातला सर्वाधिक सुंदर क्षण आणि टेंशन फ्री आयुष्य. प्रत्येकाच्या आपल्या शाळेतील काहीनाकाही आठवणी असतात. तुम्ही शाळेत असताना अनेकदा बाकांवर ढोल ताशा वाजवला असेल. बरेच खट्याळ विद्यार्थी शाळेत मधल्या सुट्टीत किंवा ऑफ लेक्चरला अशा करामती करत असतात. (Latest Viral Video)

School Students
Teacher Viral Video : शिक्षिकेचा आक्षेपार्ह डान्स व्हायरल, विद्यार्थ्यांनी दिलेली माहिती आणखी संतापजनक

शाळेतील अघाव मुलांचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तुम्ही देखील त्यांचे बरेच व्हायरल व्हिडीओ पाहिले आतील. अशात सध्या शाळेतील मुलांचा ढोल ताशा वाजवतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्व विद्यार्थी जबरदस्त ढोल वाजवत आहेत.

मात्र त्यांनी हा ढोल बँचवर वाजवला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही एकूण 4 मुलं आहेत. या पैकी दोघांनी बँचचा ढोल केला आहे. तर दुसऱ्या एका मुलाने कंपास बॉक्स समोर ठेवला असून हातात दोन पेन पकडले आणि हा यांचा ताशा. अशा पद्धतीने हे सर्वजण ढोलताशा वाजवतायत.

हा व्हिडीओ बिहारमधील असल्याचे समजले आहे. शाळेतीलच एका शिक्षकाने या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच बिहारमधील टॅलेंटेड मुलं असं कॅपशन लिहिलं आहे. आम्ही देखील शाळेत अशी मजामस्ती केली आहे. असं एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर अन्य काहींनी या मुलांच्या कलेचे कौतुक केले आहे.

School Students
Funny Viral Video : जुगाडू बाप, चिमुकल्याला दुधाच्या किटलीत बसवलं! रितेश देशमुखने शेअर केला VIDEO

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com