Boy Jump Crocodile Lake: मगरींनी भरलेल्या तळ्यात मुलाने उडी मारली; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Boy Jump Crocodile Lake Viral Video: सध्या सोशल मीडियावर काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Boy Jump Crocodile Lake
Boy Jump Crocodile LakeSaam TV

Crocodile Viral Video:

माणसांना प्राणी पाळण्याची फार आवड असते. अनेक जण कुत्रा, मांजर यांसाह जंगली प्राणी देखील पाळतात. या प्राण्यांना जीव लावला त्यांच्यावर प्रेम आणि माया केली तर ते कायम आपल्यासोबत राहतात आणि कोणतीही हाणी पोहचवत नाहीत. असं अनेक प्राणी प्रेमी म्हणतात. सध्या सोशल मीडियावर काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झालाय. (Latest Marathi News)

जंगली प्राण्यांमध्ये अनेक व्यक्ती साप आणि वाघ देखील पळताना दिसतात. अशात एका व्यक्ती शेकडो मगरी पाळल्या आहेत. या मगरी ज्या तलावात पाळल्यात त्यात त्यांचा एक लहान मुलगा उडी घेतो. या मगरीचे तोंड बांधलेले नसते. त्या इकडून तिकडे पळतच असतात.

Boy Jump Crocodile Lake
MS Dhoni Viral Video : ना ऑटोग्राफ, ना फोटोग्राफ, ना सेल्फी... महिला फॅनने थेट पाय धरले; धोनीच्या रिअ‍ॅक्शनने मन जिंकलं

त्या पाण्यात एक लहान मुलगा उडी मारतो. व्हिडीओमध्ये त्याला उडी मारताना पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरते. या मुलाचं आता काय होणार असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल. मात्र मनात कोणतीही भीती न ठेवता तो पाण्यात पोहू लागतो. हसहसत पोहतानाचा त्याचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

पाण्यात पोहताना अचानक एक मगर त्याच्या पाठीवर येते. हे पाहून देखील तो घाबरत नाही. उलट त्या मगरीसोबत चिमुकला आणखीन पोहू लागतो. पाठीवर एखादी मांजर आहे अशा पद्धतीने तो मगरीसोबत पोहत असतो. @tig_erworld या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मुलाची काळजी व्यक्त केली आहे.

Boy Jump Crocodile Lake
Viral Video: हृदयस्पर्शी! अमेरिकेत भारतीय जेवण पाहिलं... चिमुरडीचा आनंद गगनात मावेना; दत्तक मुलीचा सुंदर व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com