Bride Cancel Wedding : मंगलाष्टक झाले, अंतरपाठ पडला... अन् नवरदेवाकडे पाहून नवरीने लग्नच मोडलं

Viral News : विशेष म्हणजे मंगलाष्टका झाल्यानंतर नवरीने नवरदेवाला पाहिले आणि थेट लग्नच मोडले.
Bride Cancel Wedding
Bride Cancel Weddingsaam tv

Bride Called Off Wedding : घरच्यांच्या इच्छेनुसार मुली शांतपणे लग्न करतील असे म्हणणं आता योग्य होणार नाही. कारण आता जग खूप पुढे गेले आहे. मुली उच्च शिक्षण घेत आहेत. अनेक मुली धाडसी निर्णय घेताना आपण पाहतो. आजच्या मुलींना त्यांच्या लग्नाबाबत निर्णय कसा घ्यायचा याची कल्पना असते. घरच्यांनी ठरवलं आणि मुलीने लग्न केलं असं क्वचितच होत असेल. कारण आता मुलींची सहमती देखील तेवढीच महत्त्वाची असते, जेवढी मुलाची असते. अन्यथा मुली लग्नाला नकार देतात.

विशेष म्हणजे हुंडा किंवा इतर कोणत्याही प्रकारे दबाव आणून लग्न करण्याचा ट्रेंड आता संपला आहे. कारण एका मुलीने लग्नाला आलेली वरातच परत पाठवल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे मंगलाष्टका झाल्यानंतर नवरीने पाहिल्यांदा नवरदेवाला पाहिले आणि थेट लग्नच मोडले. बिहारच्या सीतामढीमध्ये हा प्रकार घडला आहे. या नवरीने तिच्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याला वरमाला टाकताना पहिल्यांदा पाहिलं आणि त्याला पाहताच तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. नवरीला नवरदेवाचा रंग न आवडल्याने तिने लग्नास नकार दिला.

Bride Cancel Wedding
खरंय! एका वाघाची शिकार, एका हरणीने केली; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video पाहाच

लग्नापूर्वी नवरदेवाचा फक्त फोटो पाहिला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वधूने लग्नापूर्वी वराला पाहिले नव्हते. लग्नापूर्वी तिने फक्त वराचा फोटो पाहिला होता. तिने थेट लग्नाच्या दिवशी वराला पाहिले तेव्हा तिला तो मुलगा अजिबात आवडला नाही. त्यामुळे तिने लग्न करण्यास नकार दिला. गेल्या बुधवारी हा संपूर्ण प्रकार घडला.

नवरदेवाचा रंग आवडला नाही

विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात नवरदेवाची वरात वाजत गाजत आली. मंगलाष्टकाही झाल्या. त्यानंतर अंतरपाठ खाली झाला आणि वधू-वर एकमेकांना वरमाला घालण्यासाठी पुढे आले. दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्या. परंतु नवरदेवाचा रंग पाहून वधू मंचावरून खाली उतरली आणि तिथून निघून गेली. नातेवाईकांनी तिला कारण विचारले तेव्हा तिने नवरदेवाचा रंग न आवडल्याचं सांगत लग्नास नकार दिला.

Bride Cancel Wedding
Viral Video Stunt On Well: बाबो! जाम जोरात लागलं!; पठ्ठ्यानं थेट विहिरीवर घेतली कोलांटी उडी अन्..., कमरेचा खुळखूळा

दोन फेऱ्यांनंतर नवरी पुन्हा निघून गेली

मात्र नातेवाईकांनी तिची समजूत काढली आणि तिला लग्नासाठी तयार केले. नातेवाईकांचे ऐकूण नवरी फेऱ्यांसाठी पुन्हा लग्न मंडपात आली. परंतु दोन फेऱ्यांनंतर वधूने आपला विचार बदलला आणि मंडपातून निघून गेली. (Viral News)

वर पक्षाला कोंडून ठेवले

वधू आणि वरांच्या बाजूच्या लोकांनी तिला खूप समजावले. पण तिने कोणाचेच ऐकले नाही. अखेर नवरदेवाला नवरी न घेताच परतावे लागले. मात्र मुलीच्या बाजूच्या लोकांनी मुलाच्या बाजूच्या अनेकांना ओलीस ठेवले आणि हुंड्यात दिलेल्या वस्तू आणि खर्चाची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर एसएचओने दोन्ही पक्षांना बसवून परस्पर संमतीने व्यवहार मिटवला. हे प्रकरण सीतामढीच्या सोनबरसा ब्लॉकच्या घूरघुरा पंचायतीत घडले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com