Chhattisgarh News: हृदयद्रावक! भाचीच्या लग्नात डान्स करता करता इंजिनिअरचा मृत्यू, धडकी भरवणारा Video समोर

Viral News: ही घटना छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातल्या डोंगरगडमध्ये घडली आहे.
Chhattisgarh Viral News
Chhattisgarh Viral NewsTwitter

Viral Video : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. भाचीच्या लग्नामध्ये (Marriage) स्टेजवर नाचत असताना मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला असून तो सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ही घटना छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातल्या डोंगरगडमध्ये घडली आहे.

Chhattisgarh Viral News
IPL Stadium Viral Video: भावाला कडक सलाम! खर्च करुन स्टेडियममध्ये गेला अन् मोबाईलवर Match बघत बसला; VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक रौजकर (52 वर्षे) असं या इंजिनिअर मामाचे नाव आहे. ते भिलाई स्टील प्लांटमध्ये नोकरी करत होते. बालोद जिल्ह्यामध्ये ते कुटुंबीयांसोबत राहत होते. भाचीच्या लग्नासाठी ते डोंगरगडमध्ये आले होते. भाचीच्या लग्नात आनंदाच्या भरात नाचत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि त्यांचा स्टेजवरच मृत्यू होतो. त्यांच्या मृत्यूमुळे लग्नसोहळ्यामध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर दु:खाचा डोंगर कोसळला.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिलीप रौजकर भाचीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत आहे. लग्न लागल्यानंतर ते त्यांची भाची आणि तिच्या नवऱ्यासोबत स्टेजवर एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ते इतक्या जोशमध्ये डान्स करत होते की लग्नाला उपस्थित असलेल्या कोणालाच वाटले नव्हते की असं काही घडेल. दिलीप स्टेजवर डान्स करता करता अचानक थांबतात. त्यानंतर ते स्टेजवरच खाली बसतात. बसल्यानंतर काही सेकंदातच ते खाली कोसळतात.

दिलीप खाली पडल्याचे पाहून एकच खळबळ उडते. सर्वजण त्यांच्या दिशेने धावून जातात. ही संपूर्ण घटना लग्नसोहळ्यात व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सर्वजण तात्काळ दिलीप यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातात. पण तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो. डॉक्टर दिलीप यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषीत करतात. दिलीप यांचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com