Viral Video: हेल्मेट घालून जोडप्याचा धावत्या बाईकवर रोमान्स अन् स्टंट; VIDEO पाहून डोकंच बाद होईल

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी सध्याची तरुणाई कधी काय करेल याचा काही नेम नाही.
Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी सध्याची तरुणाई कधी काय करेल याचा काही नेम नाही. कधी बाईकवर स्टंटबाजी करत तर कधी रस्त्यावर डान्स करत हे तरुण चर्चेत येत असतात. आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे स्टंट व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. (Latest Marathi News)

Viral Video
Virar News: सायकल चालवाताना अचानक हँडल तुटला, मुलगा गंभीर जखमी; घटनेचा धक्कादायक Video आला समोर

आजची तरुणी पिढी जीवाची पर्वा न करता अनेक धक्कादायक स्टंट करताना दिसून येतं आहे. स्वत:सोबतच इतरांचाही जीव हे लोक धोक्यात घालतात. सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करण्याचा नवीनच ट्रेंड पाहिला मिळतं आहे.

अशातच सोशल मीडियावर (Social Media) आणखी एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कपल रस्त्यावर स्पोर्ट्स बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहे. सध्या तरुणाईच्या डोक्यात स्टंटबाजीची क्रेझ पाहायला मिळते. 

दुसरीकडे, काही लोक छोट्याशा चुकीमुळे अपघाताला बळी पडताना दिसतात. हा स्टंट व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जे पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या दुचाकीवर बसलेली जोडपी हेल्मेट घालून स्टंट करताना दिसतात. (Viral Video)

दुचाकीवर स्टंट

व्हायरल होत असलेला व्हिडिओ stars_of_jharkhand नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपे हेल्मेट घालून दुचाकी चालवताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दोन्ही बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. मुलगी बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसलेली दिसत आहे. यादरम्यान ती मुलीकडे तोंड करून बसलेली आहे तर मुलगा हँडल सोडून बाईक चालवत आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com