Delhi Metro Video: तरूणी मुलाचे 'गालगुच्चे' घेत होती; चिडलेल्या महिलेनं दोघांचेही कान उपटले, मेट्रोतला VIDEO व्हायरल

Viral Video : व्हिडिओत रोमान्स करणाऱ्या कपलला एका महिलेने चांगलच सुनावलंय.
Delhi Metro Video
Delhi Metro VideoSaam Tv

Delhi Metro Women Objects On Couple

दिल्ली मेट्रो म्हणजे भांडण-तंटा, फॅशन शो आणि प्रेमवीरांचा अड्डा असंच चित्र पाहायला मिळतं. मेट्रोतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जागेवरून भांडण तर, कधी प्रेमवीरांचे रोमान्स असले प्रकार घडताना दिसतात. दिल्ली मेट्रोमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रोमान्स करणाऱ्या कपलला एका महिलेने चांगलच सुनावलंय.

एक जोडपं मेट्रोत अश्लील चाळे करत होतं. ते अन्य प्रवासी महिलेनं बघितलं आणि तिचा संताप अनावर झाला. तिनं या जोडप्याला चांगलंच झापलं. या दोघांनाही ट्रेनमधून हाकलून द्यावं, असं ती बोलताना या व्हिडिओत दिसते. हा सगळा प्रकार घडत असताना अन्य प्रवासी हसत होते. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही खूप हसू येईल.

Delhi Metro Video
Delhi Metro Viral Video: बॉयफ्रेंडसोबत फिरतेस... सीटवरुन वाद, मेट्रोत रंगला तुफान राडा; व्हिडिओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला त्या कपलाला त्यांच्या आक्षेपार्ह वागण्यावरून चांगलेच खडेबोल सुनावताना दिसली. 'हे सर्व बाहेर जाऊन करा. बऱ्याच वेळापासून मी बघतेय ही मुलगी त्या मुलाचे गाल खेचतेय. काही न काही करतेय', असं म्हणत त्यांची कानउघाडणी केली. यावर ती समोरची तरुणीदेखील त्या महिलेशी वाद घालायला लागली.

या व्हिडिओमध्ये ती महिला त्या कपलला ओरडत असताना मेट्रोमधील इतर प्रवाशांचे मनोरंजन होत होते. प्रवासी या संवादावर हसताना दिसले. दिल्ली मेट्रोतील या प्रकाराने मात्र प्रवाशांचे चांगलेच मनोरंजन झाले.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. त्या काकींना पंचायत करायची काय गरज होती. काकी त्या कपलच्या प्रेमामध्ये अडथळा ठरल्या, अशा कमेंट आल्या आहेत. तर दिल्ली मेट्रोची अवस्था पब्लिक पार्कपेक्षाही वाईट आहे, अशाही काही कमेंट आल्या आहेत. या व्हिडिओचा नेटकऱ्यांनी चांगलाच आनंद घेतला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये असाच एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. एका कपलला महिलेने थोडं सरकायला सांगितलं. जेणेकरुन त्यांनाही सीटवर बसता येईल. परंतु यावरुन तरुणी आणि त्या महिलेमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या व्हिडिओवरही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com