खरंय! 'एका वाघाची शिकार, एका हरणीने केली'; विश्वास बसत नसेल तर हा Viral Video पाहाच

Dabkya Pavlani Ali Mazi Malkin Zali Viral Video: सध्या सोशल मीडियावर 'एका वाघाची शिकार, एका हरणीने केली', या गाण्यावरील रील्स तुफान व्हायरल होत आहे.
Viral video
Viral video Saam tv

Leopard and Deer Viral Video: सध्या सोशल मीडियावर 'एका वाघाची शिकार, एका हरणीने केली', या गाण्यावरील रील्स तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर या आशयाच्या गाण्यावरील रील्सने धुमाकूळ घातला आहे. अनेक जोडपे या गाण्यावरील रील्स बनवत आहेत. तर दुसरीकडे काही नेटकरी हरीण वाघाची शिकार करूच शकत नाही, असे सांगत गाण्यासहित रील्स बनवणाऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. याच दरम्यान, बिबट्या आणि हरणाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

'दबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली; एका वाघाची शिकार एका हरणीनं केली' हे गाणं सध्या तुफान चर्चेत आहे. हे गाणं 'फतवा' या चित्रपटातलं आहे. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित 'फतवा' चित्रपट गेल्या ९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या सिनेमात गौतम आणि श्रद्धा भगत यांनी प्रमुख भूमिका साकरल्या होत्या. गौतम आणि श्रद्धा भगत ही सिनेसृष्टीतील नवी जोडी आहे. याच 'फतवा' सिनेमातील 'एका वाघाची शिकार एका हरणीनं केली' हे गाणं आता व्हायरल होत आहे.

Viral video
Viral Video: 'उड जायेगा एक दिन पंछी...'; प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमध्ये काकांनी गायली जबरदस्त कव्वाली

या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या ट्रेडिंग विषयाची सर्वत्र चर्चा होत आहे. याच गाण्याशी सुसंगत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हरिणीने बिबट्याची फजिती केलेल्याचा व्हिडिओ इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने शेअर केला आहे.

अभिषेक सोमवंशी नावाच्या नेटकऱ्याने केविन पीटरसनचा व्हिडिओ रि-ट्विट केला आहे. अभिषेकने या व्हिडिओला 'वाघाची शिकार हरणीने केली, हा ट्रेडिंग विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला', असं कॅप्शन दिलं आहे.

केविनने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ७२ जणांनी रिट्विट केला आहे. तर हजारो जणांनी हा भन्नाट व्हिडिओ पाहिला आहे. अभिषेकने रिट्विट केलेल्यावर व्हिडिओवर एकाने हा वाघ नसून बिबट्या असल्याचे म्हटलं आहे. मात्र, अभिषेकने त्यास व्हिडिओचा मतितार्थ समजून घेण्यास सांगितले आहे. हा व्हिडिओ अनेकांना चकीत करणारा आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'बिबट्या हरिणीची शिकार करण्यास येतो. त्यावेळी हरिण जीवाचा आटापिटा करत बिबट्याचा सामना करते. शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याची हरणीने चांगलीच फजिती केल्याचे दिसून येते.

हरिण बिबट्याला पाहून प्रचंड वेगाने पळू लागते. त्यावेळी बिबट्या हरिणीला घट्ट पकडून राहतो. त्यामुळे तशाच अवस्थेत हरिण बिबट्याला घेऊन पळते. ३१ सकेंदाच्या व्हिडिओमध्ये बिबट्याने हरिणीची शिकार केली का, हे समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com