Viral Video News: परीक्षेच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत मजा... तरुणाने बायकोला रंगेहाथ पकडलं अन्; व्हिडिओ तुफान व्हायरल

Husband Caught His Wife Roaming With Other Guy on KTM: परीक्षेचे कारण सांगून बाहेर पडलेली पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना रंगेहाथ सापडली अन् तुफान राडा झाला...
Husband Caught His Wife Roaming With Other Guy on KTM
Husband Caught His Wife Roaming With Other Guy on KTMSaamtv

Huband Caught His Wife With BoyFriend Viral Video: सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही घटना सोशल मीडियाच्या माध्यामातून अगदी क्षणात सर्वत्र पसरते. अनेकदा सोशल मीडियावर असे काही हायहोल्टेज ड्रामा झालेले व्हिडिओ समोर येतात, जे पाहून नेटकरीही चक्रावतात. सध्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या राड्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video News In Marathi)

Husband Caught His Wife Roaming With Other Guy on KTM
Maratha Aarkshan: तिरडी आंदोलन करत सरकारचा केला जाहीर निषेध; काढली सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

परिक्षेचे कारण सांगून बॉयफ्रेंडसोबत मजा...

विवाहबाह्य संबंधांची (EXtra Marital Affair) प्रकरणे काही नवीन नाहीत. विवाहबाह्य संबंधातून झालेले अनेक वाद, हत्यांच्या घटना समोर येत असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. घरात पतीला परीक्षेचे कारण सांगून बाहेर पडलेली पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना रंगेहाथ सापडल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

ही तरुणी परीक्षेला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र पतीला संशय आल्याने त्याने तिचा पाठलाग केला. यावेळी ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत केटीएमवर फिरत असल्याचे दिसले. दोघांना भररस्त्यात पकडल्यानंतर पतीने भररस्त्यात गोंधळ घालायला सुरूवात केली.

Husband Caught His Wife Roaming With Other Guy on KTM
Pune Breaking News: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात संपवले आयुष्य

पतीने रंगेहाथ पकडले....

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, पत्नी त्याच्या बॉयफ्रेंडसोबत केटीएम गाडीवर आरामात फिरताना पतीला दिसते. त्या दोघांना अडवून तो रस्त्यात चांगलेच सुनावतो. घरी परीक्षेला सांगून तु फिरत आहेस, असे म्हणत तो पत्नीला मारहाण करतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पत्नीच्या प्रियकरालाही त्याने चांगलेच फैलावर घेत लाज वाटत नाही का? अशा शब्दात खडसावले. मात्र पत्नी तो मित्र असल्याचे सांगत गाडी बंद पडल्याने थांबलो असल्याचे स्पष्टिकरण देत आहे. पती मात्र पत्नीच्या या कृत्यावर चांगलाच संतापला असून पत्नीला खडेबोल सुनावत आहे.

व्हिडिओ व्हायरल...

सोशल मीडियावर आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ही तर दुसरी ज्योती मौर्या असल्याचे म्हणले आहे. तर काही नेटकऱ्यांनी पतीला फसवताना लाज वाटत नाही का? असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. पत्नी- पत्नीच्या या हायहोल्टेज ड्राम्याची सध्या माध्यमांवर चांगलीच चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com