OP Jindal Global University News :विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बटाटे पायाने कुस्करण्याचा घाणेरडा प्रकार समोर, VIDEO Viral

Viral Video : कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv

Food Prepared By Feet Video Viral

हरियाणातील ओपी जिंदाल ग्लोबल विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमध्ये अत्यंत घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ बनवले जात आहेत. याच कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजकाल लोक आरोग्याबाबत अत्यंत सतर्क झाले आहे. रोजच्या जेवणात कोणते पदार्थ, तेल, भाज्या वापरतात याकडे लक्ष देतात. अनेकदा आपण बाहेर जेवायला गेलो की तेथील किचन, स्वच्छता अशा सर्व गोष्टींचे निरिक्षण करतो. नंतरच त्या रेस्टॉरंटमध्ये जेवतो. परंतु एका विद्यापीठातच अस्वच्छ पद्धतीने जेवण बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral Video
Amchya Pappane Ganpati Aanla: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला..' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

विद्यापीठात अनेक विद्यार्थी कॅन्टीनमध्ये खातात. परंतु याच कॅन्टीनमध्ये जर घाणेरड्या पद्धतीत जेवण बनवले जात असेल तर? हरियाणातील ओपी जिंदाल युनिव्हर्सिटीमध्ये बटाटे पायाने कुस्करल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत, एक कर्मचारी शॉर्ट पॅन्ट, शर्ट आणि टोपी घालून मोठ्या पातेल्यात पायाने बटाटे कुस्करत आहे. कॉलेजच्या कॅन्टीनमधील या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमध्ये खाणे बंद केले आहे.

Viral Video
Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून गणपती बाप्पाचा प्रवास, Video सोशल मीडियावर व्हायरल

एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका विद्यार्थ्यानेच शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा म्हणतो की, 'छी! उद्यापासून मी हे जेवण जेवणार नाही'. विद्यार्थ्यांनी या गोष्टीला तीव्र निषेध केला आहे. त्यानंतर कॅम्पसमधील कॅन्टीन बंद केल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकारानंतर ओपी जिंदाल ग्लोबल विद्यापीठाच्या व्यवस्थापन कमिटीने सोडेक्सो या अन्न व्यावसायातील कंपनीला नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडून कारण मागितले आहे. जर विद्यापीठातच असा प्रकार घडत असल्यामुळे विद्यार्थी त्यांच्या आरोग्याबाबत चिंतेत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com