Viral Cricket Video: टांगा पलटी,घोडे फरार.. चौका अडवायला गेला अन् दोघांना घेऊन गेला, पोट धरून हसवणारा VIDEO एकदा पाहाच

Funny Moments In Cricket: क्षेत्ररक्षकासोबत मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे.
viral video
viral videoyoutube

Viral Funny Video In Cricket: टेनिस क्रिकेटचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. टेनिस क्रिकेटमध्ये क्रिकेट पाहण्यासह आणखी खुप काही गोष्टी घडत असतात. एखादा फिल्डर डाइव्ह मारून अप्रतिम झेल टिपतो.

तर अनेकदा अंपायर मजेशीर डान्स करताना दिसुन येत असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात टेनिस क्रिकेट स्पर्धेतील सामना सुरु असताना, क्षेत्ररक्षकासोबत मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे.

viral video
Viral Cricket Video: सूपला शॉटला विसरा आता मार्केटमध्ये आलाय 'झोपल्या शॉट',VIDEO होतोय व्हायरल

क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजासह क्षेत्ररक्षकही तितकाच महत्वाचा असतो. कारण एक चांगला फलंदाज धावा करतो, एक चांगला गोलंदाज विकेट्स घेतो. मात्र दोघेही फॉर्ममध्ये नसले तर संघाला गंभीर परिणाम भोगावे लागतात.

मात्र क्षेत्ररक्षक असा एकमेव खेळाडू असतो जो कुठल्याही परिस्थतीत संघासाठी धावा वाचवण्याचं काम करत असतो. असाच एका क्षेत्ररक्षक सध्या जोरदार चर्चेत आहे.

तर झाले असे की,टेनिस क्रिकेट स्पर्धेतील सामना सुरु होता. गोलंदाजाने आखुड टप्प्याच्या चेंडू टाकला ज्यावर फलंदाजाने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू वेगाने बाऊंड्रीच्या दिशेने वेगाने जात होता.

त्यावेळी बाऊंड्रीला क्षेत्ररक्षण करत असलेल्या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेला. मात्र त्याने पुर्ण प्रयत्न केला.तो वेगाने बाऊंड्री लाईनच्या दिशेने जात होता.

मात्र त्यावेळी मैदानाबाहेर बसलेल्या २ प्रेक्षकांना त्याने जोरदार धडक दिली. दोघांसह तो क्षेत्ररक्षक देखील टांगा पलटी घोडे फरार झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

viral video
Arjun Tendulkar IPL 2023: अर्जुनचं मुंबई संघात कमबॅक करणं कठीण! रोहित 'या' कारणामुळे ठेवतोय संघाबाहेर

टेनिस क्रिकेटची वाढती लोकप्रियता ..

टेनिस क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यापूर्वी टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मोजक्याच ठिकाणी केले जायचे. मात्र आता गावागावात आणि मोठ मोठ्या शहरांमध्ये देखील या स्पर्धाचे आयोजन केले जाते.

या स्पर्धांमध्ये बक्षिसाची रक्कम लाखांमध्ये असते. या स्पर्धांमध्ये चमकणारे काही खेळाडू आता परदेशात जाऊन देखील खेळत आहेत. तसेच काही खेळाडूंना राज्याच्या संघात खेळण्याची देखील संधी मिळाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com