Girls Fighting On Road: भररस्त्यात तरुणींनी एकमेकींना धूधू धुतले, Video सोशल मीडियावर व्हायरल

Latest Viral News: या तरुणींची ही हाणामारी पाहून तुम्हाला डब्लू डब्लू ई (WWE) पाहिल्यासारखेच वाटेल.
Girls Fighting On Road
Girls Fighting On RoadSocial Media

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) तरुण-तरुणींच्या भांडणांचे, हाणामारीचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. हे व्हिडिओ (Viral Video) पाहून कधीकधी तुम्हीला रागही आला असेल. तर कधी तुम्ही पोट धरुन सुद्धा हसला असाल. सध्या सोशल मीडियावर काही तरुणींचा हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. भररस्त्यात या तरुणींनी फ्री स्टाईल हाणामारी केली आहे. या तरुणींची ही हाणामारी पाहून तुम्हाला डब्लू डब्लू ई (WWE) पाहिल्यासारखेच वाटेल.

Girls Fighting On Road
Viral Video: 'तु मान मेरी जान...' चिमुकल्याच्या गोड आवाजाने लावले नेटकऱ्यांना वेड; व्हिडिओ एकदा पाहाच...

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओवर नेटिझन्स भरभरुन कमेंट्स करत आहे. हा व्हिडिओ बाहेरच्या देशातील असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका कॅफेच्या बाहेर 4 तरुणींचे भांडण सुरु आहे. हे भांडण इतक्या टोकाचे आहे की या तरुणी एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण करताना दिसत आहे. एकमेकींचे केस ओढून त्या मारामारी करत आहेत. या तरुणींची ही फ्री स्टाईल हाणामारी पाहण्यासाठी कॅफेच्या बाहेर लोकांनी गर्दी देखील केली आहे.

तरुणींची हाणामारी पाहून त्याठिकाणी एक पोलिस कर्मचारी येतो. तरुणींची भांडणं थांबवण्यासाठी हा पोलिस कर्मचारी जबरदस्त ट्रिकचा वापर करतो. या तरुणींना वेगळं करण्यासाठी तो त्यांच्यावर पेपर स्प्रे मारतो आणि त्यांना बाजूला करतो. या तरुणी डोळे चोळत चोळत बाजूला होतात खऱ्या. पण काही अंतरावर जाऊन त्या परत हाणामारी करायला सुरु करतात.

त्यांच्यावर परत स्प्रे मारण्यात येतो. त्यानंतर मात्र या तरुणी घटनास्थळावरुन पळ काढताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. तसंच अनेकांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com