Govinda Dance On Chandra Song: काय नाचलास भावा! चंद्रा गाण्यावर तरुणाचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुमचेही पाय थिरकतील

Chandra Song Dance Video Viral: चंद्रा या गाण्यावर हा गोंविदा चंद्रालाही लाजवेल असे ठुमके मारतोय.
Govinda Dance On Chandra Song
Govinda Dance On Chandra SongSaam TV

Govinda Viral Video:

काल राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळाला. गंगनचुंबी हंडी फोडत गोविंदांनी विश्वविक्रम रचला. 7, 8, 9 आणि 10 असे मनोरे रचले, त्यांचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि दरवेळी प्रमाणे गोविंदांचे नटखट, खोडकर डान्सही पहायला मिळाले. सध्या अशाच एका गोविंदाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. चंद्रा या गाण्यावर हा गोंविदा चंद्रालाही लाजवेल असे ठुमके मारतोय. (Govinda dance viral video)

राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळाला. अशातच बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या गोविंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. राहुल हिरलेकर असं या गोविंदाचं नाव आहे. दरवर्षी राहुल हंडी गाजवतो. डान्स करत बक्षीसं पटकावतो. आणि सगळ्यांचे मनोरंजन करतो. राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याच्या डान्स Skills चं सर्वत्र कौतुक होतंय.

Govinda Dance On Chandra Song
Viral Cricket Video: सेम टू सेम! तीच ॲक्शन अन् तोच लूक; हुबेहूब शोएब अख्तरसारख्या दिसणाऱ्या गोलंदाजाचा VIDEO व्हायरल

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्यावर अनेकांनी रिल्स करत ठुमके मारलेत. पण एकवार एक थर रचत ठुमके मारणारा हा पहिलाच गोविंदा आहे. मराठी पोरांना एक दिवस सुट्टी घेऊन, गगनचुंबी मनोरे रंचण्याची संधी देणारा सण म्हणजे दहीहंडी.

एकमेकांना खांद्यावर घेत मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात बेभान हिंडण्याची संधी देणारा सण म्हणजे दहीहंडी. महिना, दोन महिना पोरं हंडीची प्रॅक्टीस करतात आणि दहीहंडीच्या दिवशी मनोरे रचत बक्षीसं पटकवतात. तर काही पोरं बेभान होऊन डान्स करत आपला एकदिवसीय स्पेशल टॅलेंट दाखवतात.

Govinda Dance On Chandra Song
Little Girl Dances With Dad: पापाची चिमुकली मस्तच नाचली! 'ये लाडका है दिवाना' गाण्यावर बापलेकीची धमाल VIRAL

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com