Nagin Dance Viral Video: आजीपुढं नातीसुद्धा फिक्या, जबरदस्त 'नागिन डान्स'ने तरुणांना लाजवलं

Grandma Nagin Viral Dance Video: सध्या सोशल मीडियावर या आजीचीच्या नागिन डान्सची (Old Lady Nagin Dance) जोरदार चर्चा होत आहे.
Grandma Nagin Dance Video
Grandma Nagin Dance VideoSaam Tv

Viral Video: लग्नसोहळा (Wedding) म्हटलं की हळदीचा कार्यक्रम आला. या हळदीच्या कार्यक्रमात नवरा-नवरीसोबतच सर्वजण भन्नाट डान्स करतात. या हळदीतील डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. असाच एक हळदीच्या कार्यक्रमातील आजीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या आजीने जो काही डान्स केला आहे त्याने तरुणांना देखील लाजवलं आहे. सध्या सोशल मीडियावर या आजीचीच्या नागिन डान्सची (Grandma Nagin Dance) जोरदार चर्चा होत आहे.

Grandma Nagin Dance Video
Hingoli Political News: स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्याने रस्त्यावर उडवल्या नोटा; कारण काय?, पाहा VIDEO

एका लग्नसोहळ्याच्या हळदीमध्ये आजीसोबत तिच्या नाती सुद्धा नाचल्या आहेत. पण आजीच्या डान्सपुढे नातीचा डान्स देखील फिका पडला आहे. आजीने नववारी साडी नेसून डोक्यावर पदर घेत अशा काही डान्सच्या स्टेप केल्या आहेत जे पाहून सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हळदीच्या कार्यक्रमात डान्स सुरु आहे. पाच सहा तरुणींसोबत पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसलेल्या आजी डान्स करत आहेत. बँडबाजाच्या आवाजावर आजीने चांगलाच ठेका धरला आहे. आजीने अशा काही एक-एक स्टेप केल्या आहेत की तिच्यासोबत नाचणाऱ्या नातींना सुद्धा करता येईना. आजीच्या या डान्सपुढे तिच्या नातीसुद्धा फिक्या पडल्या आहेत. या आजीचा नागिन डान्सची स्टेप तर खूपच जबरदस्त आहे.

इतक्या वयात आजीचा हा डान्स पाहून अनेक जण तिचे कौतुक करत आहे. आजीचा हा डान्स पाहून त्यांना नाचण्याची आवड असल्याचे दिसून येत आहे. या वयातील आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून नृत्याला वयाची मर्यादा नसते हे आजीने सिद्ध करुन दाखवले असे म्हणायला हरकत नाही. आजीचा डान्स पाहून हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण आनंदी झाले. आजीचा हा नागिन डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com