Hair Curly With Lighter: बापरे! लायटर गॅसवर तापवून केसांना केलं कर्ल; हेअरस्टाइलचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Lighter Hair Curly: अतापर्यंत मेकअपचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर थक्क करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Hair Curly With Lighter
Hair Curly With LighterSaam TV

Makeup and Curly Hair Style:

मेकअप आणि हेअस्टाइल करायला प्रत्येकच मुलीला आवडते. आपण सर्वांमध्ये उठून आणि हटके दिसावं यासाठी मुली वेगवेगळे अलंकार, नवीन कपडे, हटके हेअर स्टाईल, मेकअप करतात. अतापर्यंत मेकअपचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर थक्क करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

Hair Curly With Lighter
Rekha Viral Video: रेखाने सर्वांसमोर चाहत्याला मारली चापट, रिॲक्शन बघतच रहाल...

व्हायरल व्हिडीओमध्ये एक पुरुष आपल्या पत्नीच्या केसांची सुंदर हेअरस्टाइल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने सुरुवातीला महिलेच्या केसांची एक बट घेतली. त्यानंतर गॅस ऑन करत त्यावर लायटरचा काठी सारखा भाग गरम केला. पुढे त्याने महिलेचे केस त्यावर रोल केले. काही वेळाने त्याने केस लायटरपासून वेगळे केले. त्यानंतर महिलेच्या केसांचे कर्ल तयार झाले होते.

सरळ केस असलेल्या मुलींना कर्ल आणि टाँग असलेले केस फार आवडतात. पार्रलरमध्ये जाऊन मुली यासाठी हजारो पैसे खर्च करतात आणि आपल्या केसांना कर्ल देतात. त्यापेक्षा आपण घरच्या घरी कर्ल कसे करू शकतो हे या व्यक्तीने दाखवलं आहे. हेअरकर्लचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेटकरी हा व्हिडीओ पाहून लोटपोट हसतायत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्यात. एकाने कमेंटमध्ये या व्हिडीओला देसी जुगाड म्हटलं आहे. तर आणखीन एकाने या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी पाटवले आहेत. @Madan Chikna या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझ्या पत्नीला जेव्हा मी हा व्हिडीओ दाखवला तेव्हा तिने तिचे अनेक अशा प्रकारचे देसी जुगाड मला सांगितले.

Hair Curly With Lighter
Rekha Viral Video: रेखाने सर्वांसमोर चाहत्याला मारली चापट, रिॲक्शन बघतच रहाल...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com