
पती पत्नीचं नातं विश्वासावर टिकून राहतं. त्यामुळे दोघांनीही एकमेकांचा विश्वास जिंकणे महत्वाचं आहे. मात्र सध्याच्या युगात अनेक महिला आणि पुरुष मंडळींचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे. अशा घटनांमुळे सुखी संसार मोडतात. अशात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
आपला जोडीदार आपल्याला फसवून दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवत असल्याचे समजल्यास मोठा धक्का बसतो. अनेक व्यक्ती या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये जातात. अशात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या पतीला परीक्षेला जात आहे असं सांगून घराबाहेर पडली.
मात्र परीक्षेला न जाता ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरत होती. महिलेच्या पतीला पत्नीचा संशय आला होता. त्यामुळे तो तिचा पाठलाग करू लागला. रस्त्यावर पत्नीला शोधत असताना आपली पत्नी परपुरुषासोबत असल्याचं त्याला दिसलं. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरत होती.
हे पाहून पती फार भडकला. जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिने आपल्याला फसवलं, असा विचार करत त्याने आपल्या मोबाईमध्ये पत्नीची वागणूक कैद केली. व्हिडीओ बनवत असं वागण्याचा तिला जाब विचारला. तसेच भररस्त्याच गोंधळ घातला.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. अशा महिलांना कडक शिक्षा केली पाहिजे असं काहींनी म्हटलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.