
सोशल मीडियावर आफ्रिकन महिलांनी भारतीय तरुणीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेदरलँडमधील हा मारहाणीचा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)
नेदरलँडमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या तरुणीला आफ्रिकन महिलांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आफ्रिकन महिलांनी या तरुणीला चापट, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे.
मारहाण करताना इतर लोकांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावेळी एकही लोकांनी या महिलांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही दिसत आहे.
आफ्रिकन महिलांनी तरुणींच्या झिंज्या उपटून लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याची समोर आले आहे. तब्बल चार आफ्रिकन महिलांनी भारतीय विद्यार्थिनीला मारहाण केली आहे. एका महिलेने मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर इतर महिलांनी पुढे येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ भारतात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, या तरुणीला मारहाण करण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही'. अनामिका नावाच्या युजरने म्हटले आहे की, 'भारत सरकारने या विरुद्ध कारवाईसाठी पाऊल टाकलं पाहिजे'.
दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, 'त्या तरुणीने त्या महिलेला 'ब्लॅक वु्मेन' म्हटलं असावं. त्यामुळे मारहाण झाली असावी. तरुणीने असं म्हटल्यास कोणी गळाभेट घेईल का? तर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, वास्तव असं आहे की, निर्दोष माणसाच्या बाजूने कोणीही उभे राहत नाही'.
तत्पूर्वी, आफ्रिकन महिलांनी मारहाण केलेल्या तरुणीची ओळख अद्याप समोर आलेले नाही. तसेच या आफ्रिकन महिलांचीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर दावा करण्यात आला आहे की, रंगावरून टिप्पणी केल्यानं मारहाण झाल्याची चर्चा आहे. या व्हिडिओबद्दल अद्याप पुष्टी झालेली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.