Viral Video Lawyers Clash: खळबळजनक! कोर्टातच दोन वकिलांमध्ये हाणामारी; पाहा घटनेचा VIDEO

Female and Male Lawyers Fight: या घटनेनंतर महिलेने वकिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Viral Video Lawyers Clash
Viral Video Lawyers ClashSaam TV

Court Female and Male Lawyers Clash: नवी दिल्लीतून हाणामारीची एक मोठी घटना समोर आली आहे. रोहिणी कोर्ट परिसरातील दोन वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झालीये. सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आलाय. हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर महिलेने वकिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Latest Viral Video News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महिलेने प्रशांत विहार पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. महिला वकीलने आपल्या तक्रारीत पुरुष वकिलावर अनेक आरोप केले आहेत. सदर वकिलाने आपल्याला शरीरिक शोषण आणि धमकावल्याचे आरोप केले आहेत.

Viral Video Lawyers Clash
Rs 2000 Exchange Last Date: बायबाय 2000 rs.; नोट बदलण्याची शेवटची तारीख डोक्यात फिट्ट करून ठेवा...

महिला वकीलने पुढे म्हटलं आहे की, मी रोहिणी कोर्ट क्रमांक ११३ जवळ उभी होते. त्याच वेळी या वकिलांनी मला मागून ऐऊन जोरात पकडले. या नंतर त्यांच्यात हाणामारी झाल्याचे दिसत आहे. दोन्ही वकील एकमेकांना चापटी मारत आहेत. कोर्ट परिसरातच असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. दोघांमध्ये हाणामारी सुरु असताना अनेकांनी त्यांना दूर करण्याचाही प्रयत्न केला.

या घटनेत वकील महिलेला बराच मार लागला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत. गुरुवारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी रात्री पोलीस ठाण्यात या घटनेविषयी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Viral Video Lawyers Clash
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन ट्रक एकमेकांवर धडकताच घेतला पेट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com